राजरप्पा मंदिर दर्शनाला जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात, 4 मुलांसह 13 जणांचा मृत्यू
रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चार मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला.
झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून भीषण रस्ते अपघाताचा धक्कादायक बातमी समोर आली आहे. रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर भाविक देव दर्शनासाठी जात असताना कारला अपघात झाला आहे. हे लोक प्रसिद्ध धार्मिक स्थळ राजरप्पा मंदिराकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सर्व 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात चार मुलांच्या मृत्यूमुळे ही घटना अधिकच मन हेलावून टाकणारी आहे. आयुष्याची अजून सुरुवातही झाली नाही आणि जीवनाचा शेवटही झाला. या भीषण अपघात घटनेत महिला, पुरुष आणि मुलांसह तेरा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मंदिराला भेट देण्यासाठी निघालेला प्रवास एका अशा शोकांतिकेत बदलला, जे कुटुंबे कधीही विसरणार नाहीत. पोलिसांच्या माहितीनुसार, राजरप्पा मंदिराकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा अपघात झाला.
हेसुद्धा वाचा - पत्नीला पती वारंवार माहेरी पाठवायचा, तिला आला संशय; घरात CCTV लावलं अन् मग जे समोर आलं ते धक्कादायक
एकाच गावातील इतक्या लोकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास एनएच-33 वर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ कारला एका अज्ञात वाहनाशी टक्कर झाली. रामगढचे एसडीपीओ आलोक रंजन यांनी माहिती दिली की, मृत व्यक्ती नालंदा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याजवळ सापडलेल्या आधार कार्डांवरून काहींची ओळख पटली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दिल्लीतही मोठी घटना!
दिल्लीत आज पहाटे एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. शाहदरा इथे काल रात्री उशिरा लागलेल्या आगीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीररित्या भाजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर एक रिक्षा चार्जिंग असताना ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण दुर्दैवाने यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.