विद्यार्थ्यांना सरप्राईज,16 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी जाहीर, कुठल्या विद्यार्थ्यांसाठी झालाय निर्णय?
छठपूजेनिमित्त उत्तर प्रदेशात 16 नोव्हेंबरला शाळा बंद राहणार का? सरकारी सुट्ट्या, ऐच्छिक रजा आणि वाराणसीतील स्थानिक सुट्टीचे नियम जाणून घेऊया.
छठपुजेवरुन मुंबईतील राजकीय वातावरण तापलंय. समुद्रात छठपुजा साजरी करण्याला मनसेनं विरोध केलाय. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये छठपुजा मोठ्या उत्साहात साजरी होते. उत्तर प्रदेशात छठपूजेच्या पार्श्वभूमीवर 15 आणि 16 नोव्हेंबर 2026 रोजी शाळा बंद राहणार का?, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. यंदा छठपूजेचा मुख्य दिवस 15 नोव्हेंबरला, रविवारी आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबरला सोमवार असल्याने शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होतोय.काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सुट्ट्या
उत्तर प्रदेश सरकारच्या 2026 च्या सुट्टीच्या यादीत छठपूजेसाठी 15 आणि 16 नोव्हेंबरला ऐच्छिक सुट्टीचा उल्लेख आहे. ऐच्छिक सुट्टी म्हणजे सर्व सरकारी कार्यालये किंवा शाळा आपोआप बंद राहतील, असे नाही. संबंधित नियमांनुसार सरकारी कर्मचारी या सुट्टीचा लाभ घेऊ शकतात. सार्वजनिक सुट्टी आणि ऐच्छिक सुट्टी यात आहे.
वाराणसीत स्थानिक सुट्टी जाहीर
छठपूजेच्या पार्श्वभूमीवर वाराणसीचे जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी 16 नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. उपलब्ध वृत्तानुसार, हा आदेश मुख्यतः महसूल विभाग आणि त्याच्याशी संबंधित सरकारी कार्यालयांसाठी लागू आहे. असे असले तरी वाराणसीतील सर्व शाळा आणि सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असेलच असे नाही. यासाठी संबंधित विद्यार्थी, पालकांना विभागांचा आदेश तपासणे आवश्यक आहे.
इतर जिल्ह्यामध्ये काय स्थिती?
लखनऊ, गोरखपूर, गाझीपूर आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी मिळणार की नाही, हे स्थानिक प्रशासनाचे आदेश आणि संबंधित शाळांच्या सुट्टीच्या वेळापत्रकावर अवलंबून आहे. या जिल्ह्यांतील सर्व सरकारी कार्यालयांसाठी 16 नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर झाल्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट वर्गांसाठी किंवा शाळांसाठी स्वतंत्र आदेश असू शकतात.
पालक आणि विद्यार्थ्यांनी काय करावे?
छठपूजेची सुट्टी आणि स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेली सुट्टी या दोन वेगळ्या बाबी आहेत.उत्तर प्रदेशातील पालकांनी केवळ सोशल मीडियावरील सुट्टीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. शाळेचे अधिकृत वार्षिक वेळापत्रक, मुख्याध्यापकांचा संदेश किंवा जिल्हा प्रशासनाची सूचना तपासावी, असे आवाहन करण्यात आलंय. विशेषतः 16 नोव्हेंबरला परीक्षा, प्री-बोर्ड किंवा इतर शैक्षणिक उपक्रम नियोजित असतील, तर शाळेशी संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आली आहे.