• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /School Holiday: नोव्हेंबर महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बंद राहणार शाळा; पालकांसाठी मोठी बातमी!

School Holiday: नोव्हेंबर महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बंद राहणार शाळा; पालकांसाठी मोठी बातमी!

नोव्हेंबर २०२६ मध्ये दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंतीमुळे शाळांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील शाळांच्या सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 27, 2026, 08:20 PM IST|Updated: Oct 27, 2026, 08:27 PM IST
joinshare
School Holiday: नोव्हेंबर महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बंद राहणार शाळा; पालकांसाठी मोठी बातमी!
Image Credit: नोव्हेंबर शाळांच्या सुट्ट्यांची यादी

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ऑक्टोबर महिना संपत आला असून आता वेध लागले आहेत ते सणासुदीच्या नोव्हेंबर महिन्याचे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारखे एकापाठोपाठ अनेक मोठे सण येत आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक राज्यांमध्ये प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या दिवाळी आणि इतर सणांच्या सुट्ट्या जाहीर केल्या असून काही ठिकाणी शाळा तब्बल 10 ते 12 दिवस बंद राहणार आहेत.नोव्हेंबर महिन्यातील शाळांच्या सुट्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त मोठी सुट्टी

महाराष्ट्रातील शाळकरी मुलांसाठी ही दिवाळी विशेष आनंदाची ठरणार आहे. राज्यातीस शाळांमध्ये 2 नोव्हेंबरपासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची दीर्घ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला रविवार आल्यामुळे विद्यार्थी आता थेट 16 नोव्हेंबरला शाळेत परततील. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तब्बल 13 दिवसांची सलग सुट्टी मिळाली आहे.

इतर राज्यांमध्येही सुट्ट्यांचा पाऊस

फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यांतही दिवाळीनिमित्त शाळांना भरघोस सुट्ट्या मिळाल्या आहेत. राजस्थानमध्ये 4 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असून विद्यार्थ्यांना जवळपास 12 दिवसांची सुट्टी मिळतं आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्येही दिवाळीनिमित्त 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत.

छठ पूजा आणि रविवारची सुट्टी

यंदा छठ पूजा आणि दिवाळीच्या काही प्रमुख तिथी रविवारी आल्या असल्या, तरी उत्तर भारतात विशेषतः बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये छठ पूजेचे पर्व अत्यंत उत्साहात साजरे केले जाते. 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या महासोहळ्यामुळे संबंधित भागांमध्ये आणि स्थानिक स्तरावर शाळांना विशेष सुट्ट्या किंवा कामकाज आंशिक ठेवण्याचे आदेश दिले जातात, याची पालकांनी नोंद घ्यावी.

बाल दिनी शाळांचे विशेष कार्यक्रम

देशभरात 14 नोव्हेंबर रोजी 'बाल दिन'म्हणजेच चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांत या कालावधीत दिवाळीची सक्तीची सुट्टी असेल, तिथे हा दिवस आधी किंवा नंतर साजरा केला जाईल. असे असताना ज्या राज्यांमध्ये शाळा सुरू असतील, तिथे या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला जातो.

गुरु नानक जयंतीसह इतर सुट्ट्या

नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात 24 नोव्हेंबर रोजी 'गुरु नानक जयंती' निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. या दिवशी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद राहतील. या सर्व सणांमुळे नोव्हेंबर महिना विद्यार्थ्यांसाठी फिरण्याचा आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा ठरत आहे.विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामान, प्रशासकीय आदेश आणि मंडळांच्या (बोर्डांच्या) नियमांनुसार सुट्ट्यांच्या तारखांमध्ये काहीसा बदल असू शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या संबंधित शाळेच्या संपर्कात राहून अचूक वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
School Holiday