• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! नवरात्री-दसऱ्याला कुठे १० दिवस शाळांना सुट्टी? पाहा राज्यनिहाय संपूर्ण यादी

विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! नवरात्री-दसऱ्याला कुठे १० दिवस शाळांना सुट्टी? पाहा राज्यनिहाय संपूर्ण यादी

महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांमध्ये 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमी किंवा दसऱ्याची सुट्टी आहे. मात्र, नवरात्रोत्सवाच्या सर्व दिवसांत शाळा बंद असतीलच असे नाही.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 10, 2026, 05:10 PM IST|Updated: Oct 10, 2026, 05:26 PM IST
joinshare
विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! नवरात्री-दसऱ्याला कुठे १० दिवस शाळांना सुट्टी? पाहा राज्यनिहाय संपूर्ण यादी
Image Credit: ऑक्टोबर हा सणासुदीचा महिना आहे. या काळात सारेजण आनंद, उत्साहात सण साजरे करत असतात. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सणांमुळे ऑक्टोबर महिन्यात देशातील अनेक राज्यांमध्ये शाळांना सुट्ट्या मिळणार आहेत.

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ऑक्टोबर हा सणासुदीचा महिना आहे. या काळात सारेजण आनंद, उत्साहात सण साजरे करत असतात. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. 
नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सणांमुळे ऑक्टोबर महिन्यात देशातील अनेक राज्यांमध्ये शाळांना सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, सर्व राज्यांमध्ये सुट्ट्यांचा कालावधी सारखा नाही. काही ठिकाणी नवरात्रीच्या काळात दीर्घ सुट्टी दिली जाते, तर काही राज्यांमध्ये महाष्टमी, महानवमी आणि विजयादशमी या सणांच्या दिवशीच शाळा बंद राहतात. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या निमित्ताने सलग सुट्ट्यांचे नियोजन आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही दसऱ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी मोठा आहे. कुठे आणि किती सुट्ट्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.


पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेसाठी दीर्घ सुट्टी

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा हा सर्वांत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेच्या सुट्टीच्या यादीत १५ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दुर्गापूजेसाठी सुट्टी नमूद करण्यात आली आहे. महाचतुर्थीपासून विजयादशमीपर्यंत उत्सवाचा काळ असतो. त्यानंतर लक्ष्मीपूजेच्या निमित्तानेही सुट्टीचा समावेश आहे. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्यांचा लाभ मिळू शकतो.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये दसऱ्याची सुट्टी

आंध्र प्रदेशमध्ये शाळांच्या दसरा सुट्ट्यांचा कालावधी 10 ते 21 ऑक्टोबर असा नमूद करण्यात आला आहे. तेलंगणामध्येही 10 ते 22 ऑक्टोबरदरम्यान दसऱ्याची सुट्टी असल्याचे वृत्त आहे. या काळात बथुकम्मा, महानवमी आणि विजयादशमीसारखे सण साजरे केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सलग अनेक दिवस शाळेतून विश्रांती मिळू शकते.

बिहारमध्ये दुर्गापूजेसाठी 17 ते 21 ऑक्टोबर सुट्टी

बिहारच्या 2026 मधील शालेय सुट्टीच्या दिनदर्शिकेनुसार दुर्गापूजेसाठी 17 ते 21 ऑक्टोबरदरम्यान पाच दिवसांची सुट्टी नमूद आहे. याशिवाय नवरात्रोत्सवाशी संबंधित काही दिवसांची नोंदही दिनदर्शिकेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सणाच्या काळात सुट्ट्यांचे नियोजन करता येईल. तथापि, सरकारी शाळा, खासगी शाळा आणि वेगवेगळ्या शिक्षण मंडळांनुसार प्रत्यक्ष सुट्टीचा कालावधी वेगळा असू शकतो. पालकांनी शाळेकडून आलेल्या अधिकृत सूचनेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तामिळनाडूमध्ये आयुधपूजा आणि विजयादशमीला सुट्टी

तामिळनाडूमध्ये तिमाही परीक्षांनंतर ५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होण्याचे वेळापत्रक नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १९ ऑक्टोबरला आयुधपूजा आणि 20 ऑक्टोबरला विजयादशमीच्या निमित्ताने सुट्टी असू शकते. इतर राज्यांप्रमाणेच येथेही सण आणि शाळेच्या दिनदर्शिकेनुसार सुट्ट्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांचे वेळापत्रक, शाळा सुरू होण्याची तारीख आणि सणांच्या सुट्ट्या यांची एकत्रित माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये 20 ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी

महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांमध्ये 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमी किंवा दसऱ्याची सुट्टी आहे. मात्र, नवरात्रोत्सवाच्या सर्व दिवसांत शाळा बंद असतीलच असे नाही. काही ठिकाणी महाष्टमी किंवा महानवमीची अतिरिक्त सुट्टी दिली जाऊ शकते, तर काही शाळा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची अधिकृत सूचना तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
School Holiday
india