SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवून द्यायला आले अन् वंदे भारतचा दरवाजा बंद झाला, भरावे लागले ₹ 36 हजार

नातेवाईकांना सोडायला गेले अन् वंदे भारत एक्सप्रेसचे दरवाजेच बंद झाले. त्यानंतर जे झालं ते धक्कादायक

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 17, 2026, 13:27 IST | Updated: Nov 17, 2026, 13:29 IST
Image Credit: See off gone wrong at Kanpur Central vande bharat express relatives stuck fined 36000
Join

नातेवाईकाला सोडायला आले आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले. त्यानंतर 12 नागरिकांसोबत जे झालं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. कानपूर सेंट्रल स्थानकात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या नातेवाईकाला सोडण्यासाठी 12 जण स्थानकात आले. इतकंच नव्हे तर ते ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी ट्रेनमध्ये शिरले. मात्र ट्रेनचे गेट बंद झाल्यानंतर ते आतमध्येच अडकून पडले आहे. गेट उघडण्यासाठी त्यांनी एकच गोंधळ घातला. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर रविवारी सकाळी ट्रेन इटावा स्थानकात थांबवण्यात आली व सगळ्यांना उतरवण्यात आले. इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून दंडदेखील वसुल करण्यात आला आहे.

ट्रेन क्रमांत 22415 वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस रविवारी सकाळी कानपूर स्थानकात पोहोचली होती. कानपूरमधून विविध भागातून आलेल्या 12 जण त्यांच्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी ट्रेनच्या आत शिरले. त्याचवेळी गेट बंद झाला. एकदा का वंदे भारत ट्रेनचे दरवाजे बंद झाले तर थेट पुढच्या स्थानकातच उघडतात.

वाराणसीनंतर प्रयागराज आणि कानपूरमध्ये वंदे भारतला थांबा आहे. त्यानंतर थेट दिल्लीला ट्रेन थांबते. मात्र आतमध्ये शिरलेल्या लोकांनी एकच गोंधळ घातला. यात महिला आणि मुलांसोबत आलेल्या लोकांनी ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतर काही लोकांनी  गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी टूंडला कंट्रोलला सूचना दिली.

कंट्रोल रूमला सूचना मिळाल्यानंतर सकाळी 10.49 वाजता इटावा जंक्शनवर ट्रेन थांबवण्यात आली. स्टेशन अधीक्षक पीएम मीना, आरपीएफ दिनेश कुमार आणि जीआरपी इन्स्पेक्टर यदुवीर सिंह टीमसोबत पोहोचले होते. सर्व 12 जणांना ट्रेनमधून उतरून आरपीएफ पोस्टयेथे नेण्यात आले.

आरपीएफ निरीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. गोंधळ आणि प्लॅटफॉर्म तिकिटांच्या अभावामुळे, वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 36,000 रुपयांचा दंड वसूल केला. प्रति व्यक्ती 3,000 रुपयांचे तिकीट दिले. तसंच, ही चूक पुन्हा न करण्याची ताकीद देऊन सर्वांना सोडून देण्यात आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES