src="https://cdn.ampproject.org/v0/amp-bind-0.1.js">
SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरणाऱ्यांना गृह मंत्रालयाचा गंभीर इशारा; एका चुकीमुळे होईल मोठा पश्चाताप!

व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरणाऱ्यांसाठी गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील I4C ची ॲडव्हायजरी जारी करण्यात आलीय. ऑफिस कॉम्प्युटरवर लॉगिन करताना कोणती काळजी घ्यावी? प्रत्येक वेळी लॉगआउट का आवश्यक?

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 23, 2026, 16:13 IST | Updated: Nov 23, 2026, 16:27 IST
Image Credit: व्हॉट्सअ‍ॅप वेब
Join

ऑफिसमध्ये बहुतांशजण आपल्या पीसी, लॅपटॉवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु करताात. काहीजण घरी जाताना ते लॉगाऊट करतात. तर काहीजण तसंच सुरु ठेवून जातात. पण याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात? हे आपल्याला माहिती नसतं. व्हॉट्सअ‍ॅप वेब  वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.


काय घडलंय नेमकं?

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) व्हॉट्सअ‍ॅप वेब  च्या सुरक्षित वापराबाबत ॲडव्हायजरी जारी केली आहे. या सूचनेत ऑफिसमधील कॉम्प्युटर, सार्वजनिक संगणक किंवा इतरांच्या वापरातील डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वेब  वापरताना विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. एखादे लॉगिन सेशन सक्रिय राहिल्यास त्याचा गैरवापर होऊन वैयक्तिक मेसेज, संपर्क आणि ग्रुपमधील संभाषणांपर्यंत अनधिकृत व्यक्ती पोहोचू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. ऑफिसच्या किंवा सार्वजनिक कॉम्प्युटरवर व्हॉट्सअ‍ॅप वेब  वापरताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला गृह मंत्रालयाकडून देण्यात आलाय. प्रत्येक सेशननंतर लॉगआउट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप वेब च्या लॉगिन सेशनचा गैरवापर?

नॅशनल सायबरक्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने (NCTAU) केलेल्या निरीक्षणानुसार, काही परिस्थितींमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेब चे अधिकृत लॉगिन सेशन दुसऱ्या व्यक्तीकडून गैरवापरले जाऊ शकते. अशा प्रकारे अनधिकृत प्रवेश मिळाल्यास संबंधित व्यक्ती तुमचे मेसेज वाचू शकते, तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवू शकते तसेच संपर्क आणि ग्रुप चॅटमध्ये प्रवेश मिळवू शकते. तुमच्या ओळखीचा वापर करून फसवणूक, फिशिंग किंवा सोशल इंजिनिअरिंगचे प्रकारही घडू शकतात.

सरकारी आणि गोपनीय कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब  टाळा

सरकारी, संस्थात्मक, आर्थिक किंवा गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कॉम्प्युटरवरील व्हॉट्सअ‍ॅप वेब  वापरणे शक्यतो टाळावे, असे ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. विशेषतः ऑफिस कॉम्प्युटर किंवा अनेक कर्मचाऱ्यांना वापरता येणाऱ्या सिस्टमवर लॉगिन करताना धोका वाढू शकतो. संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी संस्थांनीही अशा वापराबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फक्त टॅब बंद करून उपयोग नाही; लॉगआउट करा

व्हॉट्सअ‍ॅप वेब  वापरल्यानंतर ब्राउझरची विंडो किंवा टॅब बंद करणे म्हणजे लॉगआउट झाले, असे समजू नका. प्रत्येक वेळी काम पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वेब  मधून स्वतः लॉगआउट करा. गरज नसताना अकाउंट कायम लॉगिन ठेवू नका. सार्वजनिक किंवा शेअर केलेल्या संगणकावर ही काळजी अधिक महत्त्वाची आहे.

इनकॉग्निटो मोड आणि सार्वजनिक कॉम्प्युटरबाबत खबरदारी

व्हॉट्सअ‍ॅप वेब  वापरणे अपरिहार्य असल्यास विश्वासार्ह संगणकावर इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्रॉऊसिंग मोड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, हा अतिरिक्त खबरदारीचा उपाय आहे; लॉगआउट करण्याला पर्याय नाही. सायबर कॅफे, सार्वजनिक किऑस्क, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अनोळखी व्यक्तीचा कॉम्प्युटर वापरून व्हॉट्सअ‍ॅप वेब  वर लॉगिन करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकाउंटमधील संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नका

तुमच्या अकाउंटवरून अनपेक्षित मेसेज पाठवले जाणे, संपर्कांकडून विचित्र रिप्लाय येणे किंवा तुमच्या नकळत हालचाली होणे, ही धोक्याची लक्षणे असू शकतात. अशा वेळी अकाउंटची सुरक्षितता तपासण्याचे आवाहन करण्यात आलंय. त्याचबरोबर कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टम, ब्राउझर आणि सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवणे, संशयास्पद फाइल्स, अनोळखी डाउनलोड आणि क्रॅक्ड सॉफ्टवेअरपासून दूर राहणे, डिजिटल व्यवहार आणि संवाद सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक वापरानंतर लॉगआउट करण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे.

Related News

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES