चांदीने मोडला 46 वर्षापूर्वीचा विक्रम! अवघ्या 30 मिनिटांत 37.20 लाख कोटी...; 2027 मध्ये चांदी महागणार की स्वस्त होणार?
सोन्याच्या किंमतीबद्दल कायम बातम्या येत असतात. पण चांदीबद्दल एक मोठी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या तीव्र घसरणीमुळे एक विक्रम तोडला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये चांदी - सोन्यामध्ये चढ - उतार पाहिला मिळत आहे. तर आता चांदीच्या किमती सोन्यापेक्षा जास्त घसरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती 2.69 टक्क्यांनी घसरून सप्टेंबर 2025 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या 12 तासांपासून सुरू असलेल्या या घसरणीमुळे अंदाजे 729 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 64.9 लाख कोटी रुपयांचे नुकसान पाहिला मिळाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील अनेक शहरांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.28 लाख रुपयांपर्यंत खाली गेल्याचे पाहिला मिळाले आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 1980 च्या पातळीच्याही खाली गेला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, 1980 मध्ये चांदीत गुंतवलेले 10 हजार रुपये तब्बल 46 वर्षांनंतर केवळ 8,800 रुपये उरले असते म्हणजेच परतावा (रिटर्न) निगेटिव्ह झालाच पाहिला मिळत आहे.
चांदी 4.70 टक्क्यांनी घसरली असून, तिचे बाजार भांडवल 128 अब्ज डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 1.4 लाख कोटी रुपयांनी कमी झालंय. चांदीच्या किमती ऑक्टोबर 2025 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. गोल्डमन सॅक्ससह तज्ज्ञ आणि प्रमुख ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, अमेरिकेत महागाई झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे 2026 च्या शेवटच्या महिन्यात व्याजदरात अर्ध्या टक्क्याने वाढ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. याव्यतिरिक्त, डॉलरमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
हेसुद्धा वाचा - 2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल
18 नोव्हेंबर रोजी, दोन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.एक बँक ऑफ अमेरिकाकडून आणि दुसरा डीएसपीकडून. चांदीच्या किमतींनी अनेक विक्रम मोडले असून, 46 वर्षांचा विक्रमही
मोडीत काढला आहे. 2026 मध्ये प्रति औंस 121 डॉलर या सर्वकालीन उच्चांकावरून किमती 61% नी घसरल्या आहेत. त्या 1980 च्या पूर्वीच्या उच्चांकापेक्षाही खाली व्यवहार करत आहेत. ही घसरण का होत आहे? चांदी आणि सोन्याची विक्री कधी थांबेल? बँक ऑफ अमेरिकाच्या (BofA) एका नवीन अहवालानुसार, मजबूत अमेरिकन डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीची भीती, यांमुळे चांदीच्या किमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतो. मजबूत डॉलरमुळे इतर चलनांमध्ये चांदी खरेदी करणे अधिक महाग होते, ज्यामुळे खरेदी कमी होते. दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढत आहे.
तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांसंबंधीच्या हालचालींवर अधिकाधिक लक्ष ठेवून आहेत. जर व्याजदर वाढले, तर गुंतवणूकदारांना कमी जोखमीत जास्त परतावा देणारे इतर गुंतवणुकीचे पर्याय अधिक अनुकूल वाटतील. पुढे काय? तीव्र घसरण होऊनही, बँक ऑफ अमेरिकाच्या (BofA) अहवालातील अंदाजानुसार, 2027 पर्यंत चांदीचा भाव प्रति औंस 75 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. बँकेच्या मते, जर स्थूल आर्थिक दबाव कमी झाला, तर चांदीला आणखी आधार मिळू शकतो. BofA च्या अंदाजानुसार, 2026 मध्ये चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा 910 टनांनी जास्त असू शकतो. पण, 2027 मध्ये परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.