SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चांदी तब्बल 197,395 रुपयांनी तर, सोनं 33,800 रुपयांनी स्वस्त; 8 महिन्यात अचानक गडगडले सोनं चांदीचे दर

भारतात सोनं चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. 8 महिन्यात चांदी तब्बल 197,395 रुपयांनी तर, सोनं 33,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 13, 2026, 10:21 PM IST | Updated: Oct 13, 2026, 10:34 PM IST
Join

Gold- Silver price : जानेवारी 2026 मध्ये विक्रमी उच्चांक गाठणारे सोनं चांदीचे दर 8 महिन्यात अचानक गडगडले आहेत.  चांदी तब्बल 197,395 रुपयांनी तर, सोनं 33,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  डॉलर मजबूत झाल्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव आला आहे. देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. 

जागतिक बाजारात, कॉमेक्सवर सोन्याचे वायदे प्रति औंस सुमारे 4,200 डॉलरवर, तर चांदीचे वायदे प्रति औंस सुमारे 60.50 डॉलरवर व्यवहार करत होते.  देशांतर्गत बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,49,450 वर, तर चांदीचा दर प्रति किलोग्रॅम सुमारे 2,22,650 इतका होता. एकूण आकडेवारी पाहता भारतीय सराफा बाजारात प्रचंड घसरणा झाली आहे. 
जानेवारी 2026 मध्ये चांदीचा दर 4.50 लाखांपर्यंत पोहचला होता. तर, सोन्याच्या दराने देखील 1.80 लाखाच्या आसपास विक्रमी दराचा उच्चांक गाठला होता.

सोनं स्वस्त का होत आहे?

भारतीय चलन रुपया मजबूत  झाल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी, सलग तिसऱ्या दिवशी रुपयामध्ये जोरदार सुधारणा दिसून आली आणि डॉलरच्या तुलनेत 40 पैशांची वधारून तो 95.38 वर बंद झाला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अलीकडेच कठोर निर्णय घेतले. यामुळे रुपयाला मजबूती मिळाली. रुपयाच्या अवमूल्यन कमी करण्यासाठी आरबीआयने घेतलेले निर्णय गेम चेंजर ठरले. यामुळे रुपया वधारला आहे.    आरबीआयच्या कठोर उपाययोजनांमुळे डॉलरची मागणी कमी झाली आहे. परकीय चलन बाजारातील अनावश्यक सट्टेबाजीला आळा बसला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रुपया मजबूत होतो. डॉलरच्या तुलनेत परदेशातून सोने आयात करणे स्वस्त होते. याचा थेट फायदा देशांतर्गत बाजारात कमी झालेल्या किमतींच्या स्वरूपात ग्राहकांना होतो.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES