• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /52 कोटी ग्राहक, ₹60 लाख कोटींच्या ठेवी असलेल्या भारतीय बँकेवर सायबर हल्ला; ग्राहकांच्या अकाऊंटवरील पैशांचं काय होणार? बँकेनेच सांगितलं; इथं तुमचं खातं तर नाही ना?

52 कोटी ग्राहक, ₹60 लाख कोटींच्या ठेवी असलेल्या भारतीय बँकेवर सायबर हल्ला; ग्राहकांच्या अकाऊंटवरील पैशांचं काय होणार? बँकेनेच सांगितलं; इथं तुमचं खातं तर नाही ना?

बँकेच्या देशभरामध्ये 22500 पेक्षा जास्त शाखा आहेत. तर या बँकेची देशात एकूण 63580 इतक्या मोठ्या संख्येनं एटीएम आहेत. ही देशातील सर्वात मोठी बँक असून तिच्यासोबत नेमकं घडलं काय? खातेदारांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या..

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 22, 2026, 08:22 AM IST|Updated: Oct 22, 2026, 08:46 AM IST
joinshare
52 कोटी ग्राहक, ₹60 लाख कोटींच्या ठेवी असलेल्या भारतीय बँकेवर सायबर हल्ला; ग्राहकांच्या अकाऊंटवरील पैशांचं काय होणार? बँकेनेच सांगितलं; इथं तुमचं खातं तर नाही ना?
Image Credit: बँकने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारतामधील सर्वात मोठी सरकारी  बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेवर म्हणजेच एसबीआयवर सायबर हल्ला झाला आहे. या बँकेतील 3897 ग्राहकांची खासगी माहिती डार्क वेबवर टाकण्यात आली असून यामुळेच एकच खळब उडाली आहे. सदर प्रकरणामध्ये आता बँकेने चौकशी सुरु केली असून दुसरीकडे हा प्रकार समोर आल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्या खात्यावरील पैसे सुरक्षित आहेत ना? खात्यांवरील पैसे परस्पर कुठे जाणार तर नाहीत ना? अशी भीती कोट्यवधी ग्राहकांना वाटत असून यासंदर्भात आता बँकेनेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सायबर हल्ल्याचा खातेदारांच्या खात्यावरील पैशावर काही परिणाम झाला आहे का? नेमकं काय झालंय? याबद्दल बँकेने स्पष्टीकरण दिलं असून त्यात काय म्हटलंय ते पाहूयात...

हल्ल्याची माहिती मिळाल्यापासून बँकेने काय केलं?

देशातील वेगवेगळ्या यंत्रणांना सायबर हल्ल्यांसंदर्भात लक्ष ठेवणाऱ्या आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांकडून तसेच संरक्षण सायबर एजन्सीकडून आणि भारतीय संगण आपत्कालीन प्रतिसाद पथक म्हणजेच सीईआरटी-इनकडून एसबीआयला 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या सायबर हल्ल्याची माहिती मिळाली. यानंतर बँकेने तातडीने तपास सुरु करतानाच बँकेची सायबर सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली. माहितीचा संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी आणि घटनेची व्याप्ती निश्चित करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून ज्या माहितीवर सायबर चोरांनी डल्ला मारला आहे ती कुठून आणि कशी लीक झाली? त्याचा ग्राहकांना आणि बँकेला कसा फटका बसू शकतो याचे मूल्यांकन केलं जात आहे. चोरीला गेलेल्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी बँकेने बँकएण्डमध्ये उपाययोजना सुरु केल्या आहेत.  मुख्य बँकिंग व्यवहार, आर्थिक कामगिरी किंवा व्यवसायाच्या सातत्यावर या साऱ्याचा कोणताही मोठा परिणाम झालेला नसल्याचा दावा बँकेने केला आहे. बँकेचे नियमित दैनंदिन कामकाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू असल्याचं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

कोणती माहिती लीक झाली?

एसबीआयच्या ग्राहकांची नावं, लिंग, जन्मतारखा, मोबाइल क्रमांक, ई-मेल आणि घराचे पत्ते असलेल्या डेटावर सायबर हल्लेखोरांनी हात मारला आहे. तसेच बँकेच्या शाखांशी संबंधित तपशील, ग्राहक कस्टमर नंबर्स, कर्ज आणि इतर संबंधित डेटा चोरीला गेला आहे. 

ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे?

ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरुन आलेले मेसेज, संशयास्पद फोन कॉल आणि बनावट बैंकिंग वेबसाईट्सपासून सावध राहणे गरजेचे आहे. बँकेच्या नावाने संपर्क साधून गोपनीय माहिती मागितल्यास सत्यता तपासल्याशिवाय माहिती देऊ नये. 

ग्राहकांच्या पैशांना धोका? एसबीआय काय म्हणाली?

या हल्ल्यानंतर ग्राहकांना सर्वाधिक सतावणारा प्रश्न म्हणजे त्यांच्या पैशांचं काय होणार? ग्राहकांच्या खात्यातील पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. याबद्दल बोलताना एसबीआयने, ग्राहकांच्या खात्यातील शिल्लक रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यास आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत असल्याचेही बँकेने स्पष्ट केलं आहे. बँकेतून पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध नसून ग्राहकांसाठीच्या सर्व सेवा सुरळीत सुरु असल्याने नेहमीसारखे पैसे काढता येत आहेत.

State Bank of India (SBI) disclosed a data loss incident after an alert flagged suspected customer data exposure on the dark web. Preliminary analysis identified 3,897 exposed records containing personal information like names, phone numbers, and addresses. SBI stated the breach has no material impact on core business operations, and an independent agency is investigating

— IANS (@ians_india) October 21, 2026

बँकेच्या शाखा किती? एकूण ठेवीचा आकडा काय?

एसबीआयची एकूण ग्राहकसंख्या 50 कोटींहून अधिक (सुमारे 52 ते 53 कोटी) इतकी आहे. बँकेच्या देशभरामध्ये 22500 पेक्षा जास्त शाखा आहेत. तर देशातील एसबीआयच्या एकूण एटीएमची संख्या 63580 इतकी आहे. 2026 मधील उपलब्ध अहवालानुसार या बँकेत ग्राहकांच्या एकूण सुमारे ₹60.1 लाख कोटींच्या ठेवी आहेत. एसबीआयच्या ठेवी भारतातील सर्व खाजगी बँकांच्या एकूण ठेवींपेक्षाही जास्त आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Banking News
india