• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारल्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही?सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारल्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही?सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

इस्लाम स्वीकारल्याने एखाद्या व्यक्तीला राज्याने अधिसूचित केलेल्या विशिष्ट मागासवर्गीय मुस्लिम समुदायाचे सदस्यत्व आपोआप मिळत नाही.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 15, 2026, 08:31 PM IST|Updated: Oct 15, 2026, 08:43 PM IST
joinshare
हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारल्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही?सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Image Credit: धर्मांतर केल्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही?

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारल्यानंतर केवळ पूर्वीच्या जातीच्या आधारावर ‘मागासवर्गीय मुस्लिम’ म्हणून आरक्षणाचा लाभ मागता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तामिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या निर्णयामुळे धर्मांतरानंतर जात प्रमाणपत्र आणि आरक्षणाच्या पात्रतेबाबत सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, हिंदू सामाजिक व्यवस्थेतून अन्य धर्मात गेलेल्या व्यक्तीला केवळ धर्मांतरापूर्वीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर संविधानाच्या अनुच्छेद 16(4) अंतर्गत आरक्षणाचा लाभ मागता येणार नाही.

न्यायालयाच्या मते, पूर्वीच्या सामाजिक व्यवस्थेत अनुभवलेले मागासलेपण नव्या धार्मिक-सामाजिक व्यवस्थेत आपोआप हस्तांतरित होत नाही. त्याचप्रमाणे, इस्लाम स्वीकारल्याने एखाद्या व्यक्तीला राज्याने अधिसूचित केलेल्या विशिष्ट मागासवर्गीय मुस्लिम समुदायाचे सदस्यत्व आपोआप मिळत नाही.हा निर्णय धर्मांतर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत कोणतेही आरक्षण मिळणार नाही, असा सर्वसाधारण नियम नाही.

तामिळनाडू सरकारचा 2024 मधील आदेश काय होता?

तामिळनाडू सरकारने 9 मार्च 2024 रोजी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार मागासवर्गीय, अतिमागासवर्गीय, विमुक्त समुदाय आणि अनुसूचित जातींमधील काही व्यक्तींनी इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांना राज्यातील अधिसूचित ‘मागासवर्गीय मुस्लिम’ समुदायांमध्ये समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली होती. या आदेशामुळे पात्र व्यक्तींना संबंधित समुदायाचे प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग खुला होऊ शकत होता. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने हा आदेश असंवैधानिक ठरवत रद्द केला. राज्य सरकारने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही सरकारची याचिका फेटाळली आहे.

समीर अहमद यांच्या प्रकरणातून वादाला सुरुवात

या प्रकरणाची सुरुवात समीर अहमद यांच्या याचिकेमुळे झाली. त्यांचे पूर्वीचे नाव परमशिवम होते. ते हिंदू कुटुंबात जन्मले होते आणि त्यांनी 2015 मध्ये इस्लाम स्वीकारला. त्यानंतर त्यांनी इस्लामी रितीरिवाजांनुसार विवाह केला.पुढे त्यांनी ‘मुस्लिम लेब्बाई’ समुदायाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला. हा समुदाय तामिळनाडूमध्ये अधिसूचित मागासवर्गीय मुस्लिम समुदायांपैकी एक आहे. मात्र, तहसीलदारांनी त्यांचा अर्ज नाकारला. त्यानंतर त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली नाही आणि संबंधित सरकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेवरही प्रश्न उपस्थित केले.

अनुसूचित जातींच्या दर्जाबाबतही न्यायालयाचे स्पष्टीकरण

न्यायालयाने अनुसूचित जातींच्या दर्जाबाबतच्या घटनात्मक तरतुदींचाही संदर्भ दिला. संविधानातील अनुसूचित जाती आदेशानुसार, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त अन्य धर्म मानणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.त्यामुळे इस्लाम स्वीकारल्यानंतर पूर्वीच्या अनुसूचित जातीच्या दर्जाच्या आधारे आरक्षणाचा लाभ मागता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, अनुसूचित जातींचा दर्जा आणि इतर मागासवर्गीय समुदायांची पात्रता या स्वतंत्र कायदेशीर बाबी आहेत. त्यांची सरमिसळ करता कामा नये.

पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्यास काय?

धर्मांतरानंतर एखाद्या व्यक्तीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला, तरी तिला पूर्वीच्या जातीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ आपोआप मिळेलच असे नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.अशा प्रकरणात सक्षम अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीची मूळ सामाजिक ओळख खरोखर पुनर्स्थापित झाली आहे का आणि लागू घटनात्मक व कायदेशीर अटी पूर्ण होतात का, याची स्वतंत्र तपासणी करावी लागेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Supreme court