SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'असली कारणं ऐकून...', सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला सुनावलं; BJP उमेदवार थोडक्यात जिंकल्यानंतर Video फुटेज सापडत नसल्यावरून म्हणाले, 'जे काही...'

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला झापलं असून थेट इशाराच दिला आहे. नेमकं काय म्हटलंय केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आणि इशाऱ्यामध्ये काय नमूद केलं आहे जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 15, 2026, 09:11 AM IST | Updated: Oct 15, 2026, 09:24 AM IST
Image Credit: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये व्यक्त केली नाराजी (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआयवरुन साभार)
Join

निवडणूक आयोग आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण म्हणजेच एसआयआर संदर्भात लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह 12 विरोधी नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अन्य एका खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान टोचल्याचं दिसून आलं आहे.

प्रतिकूल निष्कर्ष काढला जाईल

कर्नाटकातील शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील 2023 च्या मतमोजणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडत नसल्याचा भारतीय निवडणूक आयोगाच्या दाव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. हा दावा सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतला असून, उपलब्ध रेकॉर्ड सादर करण्यात आयोग अपयशी ठरल्यास त्यांच्या विरोधात प्रतिकूल निष्कर्ष काढला जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. 

जे काही पुरावे आहेत ते सादर करा

कर्नाटकातील श्रृंगेरी मतदारसंघातील मतमोजणीचे व्हिडीओ रेकॉर्ड गहाळ झाल्याचे निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर याच विषयावरुन न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. "तुमचे कामच निवडणुका घेणे हे आहे. असे असताना मतमोजणीचे रेकॉर्ड गहाळ झाले असे तुम्ही म्हणूच कसे शकता? असली तकलादू कारणे चालणार नाहीत. जे काही पुरावे आहेत ते सादर करा. अन्यथा आम्हाला प्रतिकूल निष्कर्ष काढावा लागेल,' असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिला आहे.

शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे काय?

“भारतीय निवडणूक आयोग असे कसे म्हणू शकतो की त्यांचे रेकॉर्ड हरवले आहे? निवडणुका घेणे हे तुमचे मुख्य काम आहे, अशावेळी तुमच्याकडे संबंधित दस्तऐवज असणे आवश्यकच आहे. ‘आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत’ असे म्हणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तुम्ही ते निवडून आलेल्या उमेदवाराला दिले होते. तुमच्याकडे रेकॉर्डची कोणतीही कस्टडी नाही का? तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे, ते पुढच्या सुनावणीच्या तारखेला सादर करा. अन्यथा, आम्हाला तुमच्या विरोधात प्रतिकूल निष्कर्ष काढावा लागेल. आम्ही अशा प्रकारची कारणे स्वीकारणार नाही,” असे न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला सुनावताना म्हटलं.

फेरमतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला मतदारसंघ 

काँग्रेसचे टी. जी. राजेगौडा यांनी 2023 मध्ये भाजपच्या डी. एन. जीवराज यांच्यावर 201 मतांनी निसटता विजय मिळवला होता. जीवराज यांनी या निकालास हायकोर्टात आव्हान दिले होते. न्यायालयाने पोस्टल मतांच्या फेरमोजणीचे व रद्द झालेल्या पोस्टल मतांच्या फेरतपासणीचे आदेश दिले. त्यात जीवराज यांना विजयी घोषित केले. त्यानंतर राजेगौडा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES