• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /खूशखबर! आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा; 'या' राज्याने केली घोषणा

खूशखबर! आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा; 'या' राज्याने केली घोषणा

तामिळनाडूत सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पितृत्व रजा दिली जाणार आहे. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी ही घोषणा केली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 26, 2026, 17:01 IST|Updated: Nov 26, 2026, 17:06 IST
joinshare
खूशखबर! आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा; 'या' राज्याने केली घोषणा
Image Credit: तामिळनाडूत सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पितृत्व रजा दिली जाणार

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तामिळनाडू सरकारमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांना प्रथमच पितृत्व रजा लागू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री विजय यांची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजा सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील महिला सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 365 दिवसांची प्रसूती रजा मिळते. पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही पितृत्व रजा सुरू करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. बाळाच्या जन्माच्या काळात आईला शारीरिक आणि भावनिक आधार देण्यासाठी तसेच नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी वडिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत सरकारने मांडले आहे.

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 15दिवसांच्या पितृत्व रजेची (paternity leave) घोषणा केली. राज्यात अशा प्रकारची सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकृत निवेदनानुसार, या नवीन तरतुदींतर्गत, विवाहित पुरुष सरकारी कर्मचारी बाळाच्या जन्माच्या अपेक्षित तारखेच्या 15 दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत, अशा प्रकारे एकूण 15 दिवसांची रजा घेऊ शकतात.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेत म्हटले आहे, "तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच पितृत्व रजा! विवाहित पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पितृत्व रजा दिली जाईल. ही रजा बाळाच्या जन्माच्या 15 दिवस आधी किंवा जन्माच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत घेता येईल."

राज्य सरकारने म्हटले आहे की, बाळाच्या जन्माच्या आसपासचा काळ माता आणि नवजात बालक या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी मातेला शारीरिक व भावनिक आधार देण्यासाठी आणि बाळाच्या देखभालीत मदत करण्यासाठी वडिलांची उपस्थिती आवश्यक असते.

तमिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 365 दिवसांची प्रसूती रजा (Maternity Leave) मिळण्याचा अधिकार आहे, तर पुरुष कर्मचारीही अशाच प्रकारच्या पितृत्व रजेची (Paternity Leave) मागणी करत होते. त्यांच्या या विनंतीचा विचार करून, सरकारने आता 15 दिवसांची पितृत्व रजा मंजूर करण्याचा आदेश जारी केला आहे.

हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा राज्य सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या अपत्याच्या बाबतीतही 365 दिवसांची प्रसूती रजा लागू केली होती. या निर्णयामुळे तिसऱ्या अपत्यासाठी मिळणारी प्रसूती रजा ही पहिल्या दोन अपत्यांच्या वेळी मिळणाऱ्या रजेच्या बरोबरीची झाली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News