SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'श्रीराम श्रीमंतांचा, तर शिव गरिबांचा देव! मोदी आणि भाजपा नेते नेहमी...'; नवा राजकीय वाद

आतापर्यंत उत्तर भारत आणि दक्षिण भारत या वादावरुन अनेकदा खटके उडालेले असतानाच आता या वादाला धार्मिक फोडणी मिळाली असून देशातील दोन प्रमुख पक्ष एका मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन आमने-सामने आलेत. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Sep 30, 2026, 11:50 AM IST | Updated: Sep 30, 2026, 12:10 PM IST
Image Credit: नव्या वादामुळे दोन मोठे राजकीय पक्ष आमने-सामने (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य 'रॉयटर्स'वरुन साभार)
Join

उत्तर भारत आणि दक्षिण भारत वाद आता धार्मिक वळणावर पोहोचला असून या वादातून केलेल्या विधानावरुन नव्या वादाचा जन्म झाला आहे. हे विधान केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी. रेवंत रेड्डीच्या ताज्या विधानावरुन भारतीय जनता पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं रेवंत रेड्डी काय म्हणाले आणि भाजपाचं त्यावर काय म्हणणं आहे ते पाहूयात...

मोदींचा उल्लेख

रेवंत रेड्डी यांनी प्रभू श्रीराम व भगवान शंकराची तुलना केली आहे. 'श्रीराम श्रीमंतांचा, तर शिव गरिबांचा देव आहे', असे त्यांनी म्हटले आहे. 'आम्ही (काँग्रेस) शिवाचे भक्त आहोत, तर भाजप श्रीरामाचा भक्त आहे', असेही ते म्हणाले. भाजपने प्रभू श्रीराम चोरले. हा श्रीमंतांचा पक्ष आहे, म्हणूनच तो 'जय श्री राम'चा जयघोष करतो, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते नेहमी 'जय श्री राम' म्हणतात, पण 'हर हर महादेव' का म्हणत नाहीत? असा सवाल रेड्डी यांनी उपस्थित केला. रेड्डी 'द कॉन्क्लेव्ह 2026' या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले असता हे वक्तव्य केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

आम्ही द्रविड आहोत, उत्तरेकडील लोक आर्य आहेत. आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत, ते भगवान रामाचे भक्त आहेत. आमच्या स्वतःच्या परंपरा आहेत, असे रेड्डी यांनी म्हटले होते. रेवंत रेड्डी यापूर्वीही वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यांनी एकदा बिहारच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपने प्रभू श्रीरामाला राजकीय चिन्ह बनवले असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपाकडून कठोर शब्दांमध्ये टीका

भाजपाने या विधानावरुन रेड्डीवर हिंदू समाज आणि देवांमध्ये विभागणी करण्याचा आरोप केला आहे. हे फोडा आणि राज्य करा असं धोरण असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी या विधानावरुन टीका करताना, "रेवंत रेड्डी आता राम आणि शिव यांच्यात राजकीय भेद निर्माण करत आहेत. तेलंगणात वेमुलवाडा (दक्षिण काशी – शिव) आणि भद्राचलम (दक्षिण अयोध्या – राम) आहेत. मुख्यमंत्र्यांनी देवांना उत्तर-दक्षिण किंवा गरीब-श्रीमंत असे विभागू नये," असं आवाहन केलं आहे. तेलंगणा भाजपा अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी  मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. हे विधान हिंदू धर्माचा अपमान करणारे आहे आणि हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असं एन. रामचंद्र राव यांनी म्हटलंय.

विश्व हिंदू परिषदेचा हल्लाबोल

विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री रेड्डी यांच्या वक्तव्यावर हल्ला चढवत मंगळवारी आरोप केला की, काँग्रेस पक्षाने समाजात फूट पाडण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांचे हे वक्तव्य श्रद्धेवरील उघड हल्ला असून काँग्रेसच्या बुडणाऱ्या जहाजातील शेवटचे प्रवासी म्हणून पक्षाचे नेते देव-देवतांमध्येही फूट पाडण्याच्या पातळीवर गेले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES