सर्वात मोठी बातमी! जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला
आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम इथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पथकावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 2 जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी परिसर सील केला आहे. तर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 2:15 च्या सुमारास कुलगाम जिल्ह्यातील एका तपासणी नाक्यावर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. नाक्यावर तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा जवानांवर हा हल्ला करण्यात आला. बाइकवरून अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे सीआरपीएफ जवांनावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही जवानांनी हल्लेखोऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर ही हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान जखमी जवानांवर अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील अलारमादेगु कॅम्पमध्ये चार जवान जखमी झाले होते. शिल्लक स्फोटकांची विल्हेवाट लावत असताना झालेल्या आयईडी स्फोटात हे जवान जखमी झाले होते. हे जवान सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या ॲम्युनिशन टेक्निशियन टीम (एटीटी) मधील होते. या टीमवर कोंटा रेंजमधील पिडमेल, डब्बाकोंटा, कोलाईगुडा आणि अलारमादेगु यांसारख्या कॅम्पची तपासणी करून, तेथे साठवलेल्या कोणत्याही शिल्लक किंवा संपलेल्या स्फोटकांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असते.