• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /वेळीच जाग न आल्याने ₹61 लाखांचं नुकसान! तरुणासोबत नेमकं घडलं काय? स्वत: सांगितला संपूर्ण घटनाक्रम

वेळीच जाग न आल्याने ₹61 लाखांचं नुकसान! तरुणासोबत नेमकं घडलं काय? स्वत: सांगितला संपूर्ण घटनाक्रम

शेअर बाजारामध्ये काही व्यवहार करताना क्षणोक्षणी अपडेट राहणं महत्त्वाचं असतं तसं नाही केलं तर लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला असून सध्या त्याच्या पोस्टची सगळीकडे चर्चा आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 20, 2026, 12:18 PM IST|Updated: Oct 20, 2026, 12:46 PM IST
joinshare
वेळीच जाग न आल्याने ₹61 लाखांचं नुकसान! तरुणासोबत नेमकं घडलं काय? स्वत: सांगितला संपूर्ण घटनाक्रम

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

'एक लहानशी डुलकी, आयुष्यभराची सुटी' किंवा 'झोपेपासून सावधान; हाच सुखी प्रवासाचा मान' अशी वाक्यं तुम्ही महामार्गावरुन प्रवास करताना वाचली असतील. चालकाने सावधपणे प्रवास करावा, झोप येत असेल तर विश्रांती घ्यावी अन्यथा अपघात अटळ आहे असा इशारा देणाऱ्या या पाट्या रस्त्यावरील प्रवासासाठी असल्या तरी या पाट्यांमधून दिला जाणारा इशारा आठवावा असा प्रकार एका तरुणासोबत घडला असून फक्त हा सारा प्रकार शेअर बाजारासंदर्भात झालाय. या तरुणाला झोप लागल्याने त्याने तब्बल 61 लाख रुपये गमावले आहेत.

61 लाख रुपयांचं नुकसान

तर ज्या तरुणासोबत हे झालं तो अवघ्या 27 वर्षांचा अशून त्याचं नाव मयंक राज असं आहे. त्याने 61 लाख रुपये गमावल्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला असून नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. खरं तर मयंकने 9 ऑक्टोबर रोजी एका एफ अँड ओ म्हणजेच फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडर्सच्या माध्यमातून एक व्यवहार केला होता. मात्र "झोपेतून वेळेत न उठल्यामुळे" त्याला 61 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यानेच याची माहिती एक्सवरुन (आधीचं ट्विटरवरुन) दिली आहे. "जास्त वेळ झोपून राहणं मला इतकं महागात पडेल, याचा मी कधी विचारच केला नव्हता," अशी कॅप्शन देत मयंकने एक स्क्रीनशॉट शेअर केलाय.

तो नेमकं काय म्हणाला?

"काल मी 'कॉल ऑप्शन्स' शॉर्ट केले होते (विकले होते), पण आज सकाळी मला वेळेवर जाग आली नाही. जेव्हा मी उठलो आणि माझी 'ओपन पोझिशन' तपासली, तेव्हा मला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं," असं मयंकने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. "हे नुकसान माझ्या ट्रेड सेटअपमधील चुकीमुळे नाही, तर शिस्तीच्या अभावामुळे झाले. जर मी वेळेवर उठलो असतो, तर 15-20 लाख रुपयांच्या नियोजित 'स्टॉप-लॉस'वर मी त्या ट्रेडमधून बाहेर पडलो असतो," असे त्याने सांगितले.

तोट्याची बेरीज-वजाबाकी

त्याने 13 ऑक्टोबरला एक्सपायर होणारे 'निफ्टी 22,000 कॉल' शॉर्ट केल्यामुळे झालेल्या 71 लाख रुपयांच्या नुकसानीचा स्क्रीनशॉट शेअर केला. 13 ऑक्टोबरला एक्सपायर होणारे '22,500 कॉल' खरेदी करून 10 लाख रुपयांचा नफा मिळवल्यामुळे त्याने आपले एकूण नुकसान काही प्रमाणात कमी केले. हाच स्क्रीनशॉट त्याने शेअर केला आहे.

महिन्याचं गणित बिघडणार

मात्र यानंतरही त्याने महिन्याच्या शेवटी मी नफ्यात असेल अशी आशा व्यक्त केली आहे. "पण ठीक आहे. गेल्या आठवड्यात मी चांगला नफा कमावला होता, परंतु या नुकसानीमुळे ऑक्टोबर महिन्यातील माझा एकूण नफा-तोटा (पी अँड एल) आता तोट्यात (रेड) गेला आहे. पाहूया उर्वरित महिना कसा जातो. मी हळूहळू नुकसान भरून काढण्यावर, शिस्त पाळण्यावर आणि ऑक्टोबर महिना नफ्यात (ग्रीनवर) संपवण्याच्या दिशेने काम करण्यावर लक्ष देईन," असे तो पुढे म्हणाला.

I never imagined sleeping in could cost me this much. Yesterday, I shorted calls, but this morning I couldn’t wake up on time. When I finally woke up and checked my open position, I was sitting on a significant loss. This loss came from a lack of discipline rather than a mistake in my trade setup. Had I woken up on time, I would have exited around my planned stop-loss of ₹15–20 lakh. But it’s okay. I made some decent profits last week, but this loss has now pushed my overall October P&L into the red. Let’s see how the rest of the month goes. I’ll focus on gradually recovering, staying disciplined, and working towards closing October in the green. I’ll keep sharing my journey with you.

— Mayank Raj (@thetraderoom_) October 9, 2026

लोक काय म्हणाले?

काही एक्स युझर्सने मयंकला बीटीएसटी ट्रेड्स म्हणजेच आज खरेदी करा, उद्या विक्री करा तत्वावर व्यवहार टाळण्याचा किंवा प्रत्येक ट्रेडसाठी स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला. अन्य एकाने 8 ऑक्टोबर रोजी निफ्टी 1.5% ने घसरला असताना इतक्या कमी पातळीवर बाजार शॉर्ट करायला नको होता, असं मत नोंदवलं. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी वाढ झाली आणि 25 वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण थांबली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india