ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य
भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मोठ वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशात खळबळ माजली आहे.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन : भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याची चर्चा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात सुरु आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील अशी चर्चा आहे. तर, दुसरीकडे भाजपचे सर्वात दिग्गज नेते अमित शाह यांचे नाव देखील चर्चेत आले. अशातच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा नान न घेतला एका तामिळनाडूमधूनही पंतप्रधान बनू शकतात असं वक्तव्य केले आहे.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधानपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भविष्यात एक तमिळ व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशाच्या विविध भागांतील लोकांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. भविष्यात तमिळनाडूतील एखादा नेता पंतप्रधान होऊ शकतो असं लक्षवेधी वक्तव्य. उपराष्ट्रपतींनी केले आहे. कर्नाटकमधील व्यक्तीने देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. आता गुजरातमधून पंतप्रधान आहेत भविष्यात एखादे तमिळ व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते असं ते म्हणाले.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकात नेतृत्व करण्याची क्षमता असते. सध्या वेगवेगळ्या राज्यांतील नेते सर्वोच्च पदांवर आहेत. भविष्यात तामिळनाडूतील कोणीतरी पंतप्रधान होऊ शकतो असं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
मदुराई दौऱ्यावर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान पदाबाबत लक्षवेधी वक्तव्य केले. तामिळनाडूमधून आजपर्यंत कोणीही पंतप्रधान झालेले नाही. मात्र, सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह तीन राष्ट्रपती आणि तीन उपराष्ट्रपती हे तामिळनाडूचे आहेत. यामुळे भविष्यात तामिळनाडूचा पंतप्रधान असला पाहिजे असं ते म्हणाले.
सी.पी. राधाकृष्णन हे 1998 ते 2004 या काळात कोईम्बतूरचे भाजप खासदार होते. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्यासमवेत मीनाक्षी सुंदरेश्वरर मंदिराला भेट दिली. उपराष्ट्रपती अर्लेकर आणि माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांनी मदुराईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या पसुम्पोन या स्वातंत्र्यसैनिक आणि आध्यात्मिक गुरू मुथुरामलिंगम थेवर यांच्या जन्मस्थानी त्यांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला.
मीनाक्षी सुंदरेश्वरर मंदिराला भेट देताना, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मदुराई, तामिळनाडू आणि संपूर्ण देशातील लोकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच, भारत भविष्यात जागतिक महासत्ता बनेल यावरही त्यांनी भर दिला.
थलपथी विजय यांचे नाव पंतप्रधानासाठी चर्चेत
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानंतर थलपथी विजय यांचे नाव पंतप्रधानासाठी चर्चेत आले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांच्या चाहत्यांनी त्यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी सुरू केली आहे. उपराष्ट्रपतींचे वक्तव्य हे भविष्यात देशाचे पंतप्रधान होणाऱ्या सी. जोसेफ विजय यांच्या संदर्भात थेट होते असा दावा विजय यांच्या समर्थकांनी केला आहे. विजय यांच्यामध्ये देशाचे पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे असं विजय यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.