SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

होळीच्या दिवशी आलीय बारावीची परीक्षा, परीक्षांचे वेळापत्रक बदलणार?लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!

CBSE दहावी-बारावीच्या 2027 बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बदलणार का? असा प्रश्न विचारला जातोय. परीक्षा 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान सुधारित डेटशीट, प्रात्यक्षिक परीक्षा आणि PDF डाउनलोडची माहिती जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 09, 2026, 21:50 IST | Updated: Nov 09, 2026, 22:04 IST
Image Credit: सीबीएसई 10वी,12वी वेळापत्रक
Join

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या 2027 च्या बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी दोन्ही वर्गांचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्यात पुन्हा बदल होणार का?, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.  काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.


सीबीएसईकडून 6 नोव्हेंबरला वेळापत्रक जाहीर 

सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या 2027 च्या मुख्य बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक 6 नोव्हेंबर रोजी जाहीर केले. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षांच्या तारखा, विषयांचे कोड आणि परीक्षेच्या वेळेची माहिती पीडीएफमध्ये मिळणार आहे. हे वेळापत्रक सीबीएसईशी संलग्न भारतातील तसेच परदेशातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. बोर्डाने परीक्षांच्या सुमारे 101 दिवस आधी वेळापत्रक जाहीर केलंय.

दहावीची परीक्षा 16 फेब्रुवारीपासून

सीबीएसई दहावीच्या मुख्य बोर्ड परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून 9 मार्च 2027 रोजी संपणार आहेत. विद्यार्थ्यांना एकूण 83 विषयांच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेचे नियोजन करताना प्रत्येक विषयाच्या तारखेसोबत विषयाचा कोड तपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित यांसारख्या विषयांच्या तारखा विद्यार्थ्यांनी आपल्या विषयसंयोजनानुसार तपासाव्यात.


बारावीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 एप्रिलदरम्यान

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाही 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. दहावीच्या तुलनेत बारावीचे वेळापत्रक अधिक लांब असून शेवटचा पेपर 9 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण 121 विषयांचा समावेश आहे. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांच्या तारखा स्वतंत्रपणे तपासून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.


वेळापत्रकात बदल होणार का?

सध्या सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत कोणतीही नवीन अधिकृत अपडेट समोर आली नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या जातील किंवा विषयांच्या तारखा बदलल्या जातील, असे आता सांगता येणार नाही. मा प्रशासकीय कारणांमुळे बोर्डाला आवश्यक वाटल्यास सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा पर्याय असेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे सीबीएसईच्या वेबसाइटवरील ताज्या अपडेट्स सेक्शनवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार? 

नियमित सीबीएसई संलग्न शाळांमधील दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन 1 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार आहे. हिवाळी प्रदेशातील शाळांसाठी हा कालावधी 9 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2026 असा आहे.

वेळापत्रक डाउनलोड कसं करायचं?


CBSE ची अधिकृत cbse.gov.in. वेबसाइटला वर जा.  
मेन पेजवरील लेटेस्ट अपडेट सेक्शनवर जा.
Date Sheet for Class X and Class XII Board Examinations, 2027 या लिंकवर क्लिक करा.
पीडीएफ डाउनलोड करून विषयांच्या तारखा तपासा.
वेळापत्रकाची प्रिंट काढून अभ्यासाच्या नियोजनासाठी जवळ ठेवा.
मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनाही हे वेळापत्रक लागू असेल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES