2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल
2027 मध्ये सोन्याची किंमत किती असेल याबद्दल बाबा वेंगाने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितलेला आकडा ऐकून तुमचे डोकं गरगरेल.
गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहिला मिळाली. सोनं हे सर्वसामान्यांचा तर अवाक्याबाहेर गेलं आहे. अशातच 2027 मध्ये सोन्याचे दर किती असेल याबद्दल सर्वांना चिंता वाटतेय. अशात सोशल मीडियावर प्रसिद्ध भविष्यवर्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. बाबा वेंगाच्या भाकीतनुसार 2027 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी दरवाढ पाहिला मिळणार आहे. बाबा वेंगाच्या या धक्कादायक आणि मोठ्या भाकीतमुळे एकच खळबळ माजली आहे. खरंतर बाबा वेंगा यांच्या भाकीतबद्दल अधिकृत किंवा विश्वासार्ह काही असं नाही. पण बाबा वेंगा यांची भाकीत हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होत असते.
सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, जागतिक आर्थिक संकट किंवा रोख रकमेची मोठी टंचाई निर्माण होण्याची चिन्ह आहेत. अशा स्थितीत पारंपरिक बँकिंग व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होताना दिसणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे त्यांच्या कल वाढणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा - Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवस 5 राशींच्या लोकांसाठी आर्थिक लाभासह करिअरमध्ये मोठी संधी, पाहा बाबा वेंगाची भविष्यवाणी
काही अहवालांमधील दाव्यानुसार, 2027 पर्यंत भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 2.62 लाख ते 2.82 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका अंदाजानुसार हा भाव सुमारे 2.1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे वेगवेगळ्या स्रोतांनी अंदाज असून या दाव्यांना कुठलाही अधिकृत असं काही नाही.
जागतिक वित्तीय संस्थांनीही सोन्याच्या भविष्यातील किमतींबाबत आपले अंदाज मांडले असून ‘जे.पी. मॉर्गन ग्लोबल रिसर्च’च्या अंदाजानुसार, 2026 च्या शेवटच्या तिमाहीत सोन्याची किंमत प्रति औंस 6000 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर 2027 च्या अखेरीस हा दर प्रति औंस 6300 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.