• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /तनिष्कमधील 15 कोटींच्या दरोड्यात धक्कादायक ट्विस्ट! हातावरील टॅटूमुळे सगळा उलगडा; Youtuber निघाला चोर, वडील आणि गर्लफ्रेंडला अटक

तनिष्कमधील 15 कोटींच्या दरोड्यात धक्कादायक ट्विस्ट! हातावरील टॅटूमुळे सगळा उलगडा; Youtuber निघाला चोर, वडील आणि गर्लफ्रेंडला अटक

मदुराईमधील 'तनिष्क'मध्ये झालेल्या 15 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अटक करण्यात आली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 15, 2026, 10:06 AM IST|Updated: Nov 15, 2026, 10:12 AM IST
joinshare
तनिष्कमधील 15 कोटींच्या दरोड्यात धक्कादायक ट्विस्ट! हातावरील टॅटूमुळे सगळा उलगडा; Youtuber निघाला चोर, वडील आणि गर्लफ्रेंडला अटक
Image Credit: तनिष्कमधील 15 कोटींच्या दरोड्यात धक्कादायक ट्विस्ट

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तमिळनाडूच्या मदुराईमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या 'तनिष्क' शोरूममध्ये टाकण्यात आलेल्या  दरोड्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे पाच किलो दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी, युट्युबर निशांत अजूनही फरार आहे, तर त्याचे वडील सुरेश आणि प्रेयसी मीनाक्षी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मदुराई बायपास रोडवरील या शोरूममध्ये काही दिवसांपूर्वी मुखवटा घातलेल्या दरोडेखोराने रात्रीच्या वेळी चोरी केली होती. त्याने 15 कोटींचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने लुटून नेले होते. या घटनेनंतर काही दिवसांतच ही अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनुसरा, निशांतच्या शरीरावरील एक टॅटू तपासात अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला, ज्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या चोरीच्या घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तैनात करण्यात आली होती. तपासादरम्यान सुरेश आणि मीनाक्षी यांना अटक करण्यात आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीनंतर दागिने हलवण्यासाठी सुरेशने मदत केली होती, त्यामुळे तो या प्रकरणातील एक आरोपी ठरला. दुसरीकडे, मीनाक्षीने निशांतला चोरी करण्यासाठी आपली दुचाकी उपलब्ध करून दिली होती.

चौकशीदरम्यान सुरेश आणि मीनाक्षी या दोघांनीही चोरीत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

निशांतनेच दरोड्याचा कट रचल्याचा आरोप मीनाक्षीने केला आहे. मात्र, पोलीस तिच्या दाव्यांवर विश्वास न ठेवता पडताळणी करत आहेत. निशांतला पकडून त्याची चौकशी केल्याशिवाय या आरोपांवर विश्वास ठेवता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.

तनिष्क शोरूममधील चोरी उघड कशी झाली?

गुरुवारी सकाळी कर्मचारी शोरूममध्ये पोहोचले तेव्हा त्यांना विक्रीसाठी ठेवलेले दागिने गायब असल्याचे आढळले, त्यानंतर ही चोरी उघडकीस आली. मदुरै बायपास रोडवर स्थित या शोरूमचे उद्घाटन 14 ऑक्टोबर रोजी झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, शोरूममध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 30 टक्के दागिने चोरीला गेले आहेत.

तपासादरम्यान चोराने लिफ्ट शाफ्टजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेतून आत प्रवेश केल्याचं निष्पन्न झालं. तिथे सध्या लिफ्ट बसवण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूर्णपणे काळे कपडे घातलेला आणि पूर्ण चेहरा झाकणारा मास्क लावलेला एक व्यक्ती शोरूममध्ये दिसून आला.

पोलिसांचा संशय आहे की, आरोपीने लिफ्टच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीचा आधार घेऊन इमारतीत प्रवेश केला आणि तिथून तो तळमजल्यावर असलेल्या शोरूमपर्यंत पोहोचला.

तीन मजली शोरूममध्ये बांधकामाची आणि देखभालीची अनेक कामे सुरू होती; ज्यामध्ये लिफ्ट बसवणे, रंगकाम, तसेच विद्युत आणि प्लंबिंगच्या कामांचा समावेश होता. तळमजल्यावर विक्रीसाठी दागिने मांडलेले होते, दुसरा मजला रिकामा होता, तर तिसऱ्या मजल्यावर लॉकर बसवण्याचे काम सुरू होते.


पोलिसांना अंतर्गत व्यक्तीच्या सहभागाची शंका

अटक करण्यापूर्वी, पोलिसांनी दरोड्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. तपासकर्ते शोरूममधील आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. तसेच, ज्या वेळी दरोडा टाकला, त्या काळात परिसरातून गेलेल्या वाहनांचीही तपासणी केली जात होती.

या तपासात, संस्थेशी संबंधित किंवा अंतर्गत व्यक्तीचा सहभाग असू शकतो का, या दिशेनेही तपास सुरू होता. पोलिसांनी अलीकडच्या काळात शोरूममध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तींची ओळख आणि त्यांच्या ठिकाणांची पडताळणी केली. यामध्ये माजी कर्मचारी, तसेच बांधकाम, इंटिरिअर डेकोरेशन आणि शोकेस बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांचा समावेश होता.

मदुराई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, "आम्ही अलीकडे शोरूममध्ये आलेल्या लोकांची यादी तपासत आहोत. प्रत्येक व्यक्ती संशयास्पद आहे आणि आम्ही सर्वांची चौकशी करत आहोत. आम्ही जुन्या कर्मचाऱ्यांची माहितीही तपासत आहोत."

जरी सुरुवातीला उपलब्ध पुराव्यांवरून असे वाटत होते की ही घटना एकाच व्यक्तीने घडवली असावी, तरीही या दरोड्याचे नियोजन किंवा अंमलबजावणी करण्यात आणखी काही लोकांची मदत होती का, याचा तपासही अधिकारी करत होते.

फॉरेन्सिक तज्ज्ञांनी शोरूमची पाहणी केली. त्यांनी भिंती, लोखंडी सांगाडा, लिफ्टच्या केबल्स, दागिन्यांचे बॉक्स, जिने, पाण्याच्या बाटल्या, दरवाजे आणि दरवाजांचे हँडल यांसारख्या ठिकाणांवरून बोटांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज मदुराईमधील प्रमुख बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवरील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले होते. शोरूम रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने, आरोपीने रेल्वेने केरळ किंवा इतर उत्तरेकडील राज्यांकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा का, याचीही तपासणी केली जात होती.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime