SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमली पदार्थांविरोधात झी मीडियाची मोठी मोहीम; 'नशा मुक्त भारत' अभियान सुरू

झी मिडियाने नवी मोहिम सुरु केली आहे आणि भारत देश हा नशामुक्त कसा होणार यासंदर्भात मोहिम सुरु केली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 17:40 IST | Updated: Nov 18, 2026, 17:53 IST
Join

देशाला नशामुक्ती भारत करण्यासाठी अनेकदा सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असते. आता झी मीडियाने नशा मुक्त भारत हा नवा उपक्रमाची माहिती शेअर केली आहे. झी मीडियाने (Zee Media) अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध (Drug Abuse) सुरू केलेल्या देशभरातील बहुमाध्यमी मोहिमेची माहिती दिली आहे. झी मिडियाने नवी मोहिम सुरु केली आहे आणि भारत देश हा नशामुक्त कसा होणार यासंदर्भात मोहिम सुरु केली आहे.

झी मिडियाने 'नशा मुक्त भारत' ही मोहीम सुरु करण्याचे उद्दिष्ट कोणते?

झी मीडियाने अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी 'नशा मुक्त भारत' ही मोहीम सुरू केली आहे. 
ही मोहीम झी मीडियाच्या 16 टीव्ही चॅनेल्स, 32 डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियाच्या प्रचंड नेटवर्कद्वारे संपूर्ण देशात पोहोचवली जात आहे. 
16 नोव्हेंबर रोजी 'झी न्यूज'चा प्रमुख शो 'DNA' वर राहुल सिन्हा यांनी या मोहिमेची सुरुवात केली. 
या मोहिमेअंतर्गत येत्या काही आठवड्यांत विशेष कार्यक्रम, शोध अहवाल (investigative reports), आणि प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित कथा (ground stories) प्रसारित केल्या जातील.

मोहिमेची वैशिष्ट्ये कोणती?

व्यसनाचा परिणाम हा शरीरावर फारच भयंकररित्या होतो हे अनेकांना ठाऊक आहे, अनेकांना व्यसनामुळे जीव देखील गमवावा लागतो. केवळ औपचारिक संदेश देण्याऐवजी, या मोहिमेत व्यसनावर मात करून नवीन आयुष्य सुरू करणाऱ्या व्यक्तींचे (survivors) अनुभव, बाधित कुटुंबांचे संघर्ष आणि त्यांना मदत करणाऱ्या संस्थांचे कार्य समोर आणले जाईल. 
राष्ट्रीय पातळीवर या विषयावर सखोल चर्चा घडवून आणणे आणि नागरिकांना व्यसनमुक्तीच्या कार्यात सक्रिय भागीदार बनवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. व्यसनमुक्तीच्या या कार्यामध्ये नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे.

नेतृत्व आणि दृष्टीकोन

रक्तीम दास (CEO, झी मीडिया): झी मीडिया आपल्या टेलिव्हिजन, डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहे. 
व्यसनाविरुद्धचा लढा ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून देशाचे आरोग्य, तरुणांचे भविष्य आणि आकांक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. 
राहुल सिन्हा (व्यवस्थापकीय संपादक, झी न्यूज): व्यसन हे तरुणांच्या क्षमतेला धोका पोहोचवणारे मोठे सामाजिक आव्हान आहे. 
शोधपत्रकारिता आणि संघर्षाच्या खऱ्या कथांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने पाऊल उचलणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES