Live Updates: राज्यातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 9 november 2026: बीएमसीने मुंबईभर रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बंदी घातली. दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेक ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर, दिल्लीत नरेला भागात एका चिमुकल्याला प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील घडामोडी थोडक्यात जाणून घेऊया.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 9 november 2026: यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.साताऱ्यातील फलटण शहरात विमानतळ परिसरात एका मद्यपी ऊस ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा प्रताप समोर आला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांत पुण्याबाहेरचे बरेचसे लोक आपआपल्या गावाला गेल्याने पुण्याचे रस्ते बऱ्यापैकी मोकळा श्वास घेताना दिसताहेत.दिवाळी सणानिमित्त फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या उग्र झाली असून दिल्ली आणि मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.
09 Nov 2026 17:50 IST
‘दिवाळीत फटाके फोडल्यामुळे अनेक आजार दूर होतात’, भाजपा आमदाराचा अजब दावा
दिवाळी सणानिमित्त फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या उग्र झाली असून दिल्ली आणि मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. यामुळे अनेकांना घशातील खवखव आणि डोळ्यांची जळजळ होण्यासारखे आजार होत आहेत. फटाक्यांचे दुष्परिणाम सांगणारे आणि फटाक्यांचे समर्थन करणारे लोक आमनेसामने आलेले असतानाच पश्चिम बंगालमधील भाजपाच्या आमदारांनी फटाक्यांमुळे अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता उलटसुलट चर्चा होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यवतमाळ यांच्यामार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संबंधित महसूल व स्थानिक प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे.
09 Nov 2026 17:30 IST
शासन नियुक्त संचालकांचा मतदानाचा अधिकार रद्द करा- सतेज पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारने शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा दिलेला अधिकाराचा अध्यादेश असंवैधानिक असल्याने रद्द करावा, अशी मागणी सतेज पाटलांनी केलीय.त्यांनी यासंदर्भात त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुरुवातीपासूनच घातपाताची शंका व्यक्त करत आलेलो आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सातत्याने केली आहे. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही या प्रकरणासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर आलं, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आपण पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे काही संशयास्पद फोटो आणि संबंधित माहिती देऊन चौकशीची मागणी केली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.तसेच अशोक खरात प्रकरणातील काही बाबींचाही अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने तपास करण्याची मागणी करण्यात आली होती असल्याच ही मिटकरी म्हणाले.. वारंवार घातपाताची शंका उपस्थित होत असेल, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करावी, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे.
09 Nov 2026 17:16 IST
फटाक्यांच्या पैशावरून झाला वाद, एकाला संपवलं
फटाक्यांच्या किरकोळ पैशांच्या वादातून एकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडलीय.. 8 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या रात्री श्रीरामपूर शहरातील टिळकनगर परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. गाडी अंगावर घातल्याने एकाचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झाले आहेत.
09 Nov 2026 17:09 IST
फडणवीस त्यांना वाचवणार नाहीत, वाचवलं तर- 500 कोटी प्रकरणात जरांगेंचं मोठं विधान
पाचशे कोटीच्या खाली संदर्भात सरकार चौकशी करेल मी त्यांना वेळ दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना हा विषय माहीत नाही. म्हणून ते या लोकांना वाचवणार नाहीत. आणि जर वाचवलं तर त्यांचाही हात होता असं समजायचं, असे मनोज जरांगे म्हणाले. शिंदे साहेब म्हणतात मीही घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर हा मोठा डाग आहे ते त्या बाईला सोडणार नाहीत.सत्तेवर बसायचं असेल तर मराठ्यांशिवाय शिंदे आणि फडणवीस बसू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.
प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.