• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /भारत
  • /Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला
Live Now

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing LIVE : 8 ऑक्टोबर रोजी शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपला आहे. आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 27, 2026, 02:18 PM IST|Updated: Oct 27, 2026, 04:24 PM IST
joinshare
Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला
Image Credit: शिवसेना सुनावणी
27 Oct 2026 16:21 IST (IST)
share

शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला

 


शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. ही सुनावणी आज होणार होती.
 

27 Oct 2026 14:42 IST (IST)

उद्धव ठाकरे गटाचे नेमके आक्षेप काय?


उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातील बहुमताचा निकष यांवर या वादात महत्त्वाची चर्चा झाली आहे.

27 Oct 2026 14:39 IST (IST)

शिवसेना प्रकरण 48 व्या क्रमांकावर


सर्वोच्च न्यायालयातील आजच्या कामकाजात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाशी संबंधित प्रकरण 48 व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याआधीच्या प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचा क्रमांक येण्याची शक्यता आहे.

27 Oct 2026 14:31 IST (IST)

23 नोव्हेंबरला होणारी शिवसेना सत्तासंघर्षाची सुनावणी आज, असं काय घडलं?


महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रकरणाच्या सुनावणीसाठी अद्ययावत यादीत बदल झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी हे प्रकरण 23 नोव्हेंबरला सूचीबद्ध झाल्याची माहिती समोर आली होती.शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावरील अधिकार यांच्याशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असून एकनाथ शिंदे गटाने आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या प्रकरणात पक्षाची खरी संघटना कोणती, विधिमंडळातील बहुमताला किती महत्त्व द्यावे आणि पक्षाच्या घटनेचा विचार कसा करावा, असे मुद्दे महत्त्वाचे ठरले आहेत. उद्या सुनावणी झाल्यास या युक्तिवादांना पुढे गती मिळू शकते, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

27 Oct 2026 14:26 IST (IST)

एकनाथ शिंदेचे वकिल मनिंदर सिंग कोर्टात दाखल

एकनाथ शिंदेचे वकिल मनिंदर सिंग कोर्टात दाखल झाले आहेत. प्रकरणाचा नंबर आलेला नाही.आता 26 व्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण 48 क्रमांकावर आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Supreme court

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing 27 October 2026 LIVE Updates : सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध केले. या अगोदर आज सकाळी कोर्टाने 23 नोव्हेंबर रोजी प्रकरण सूचीबद्ध केले होते.
एकनाथ शिंदेंचे वकील मनिन्दर सिंग आणि ध्रुव मेहता युक्तिवाद करणार आहेत.