कोकणातील तिन्ही समुद्रकिनारे जागतिक पर्यटन नकाशावर येणार आहेत.
कोकणातील तीन समुद्र किनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग' मानांकन प्राप्त झाले आहे.
1/6
कोकणातील 'या' तीन समुद्र किनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग', आता जागतिक नकाशावर येणार
स्वर्गाहूनही सुंदर असा कोकणाचा उल्लेख केला जातो. आता याच कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कोकणातील तीन समुद्र किनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग' मानांकन प्राप्त झाले आहे. श्रीवर्धन, गुहागर आणि लाडघर या तीन समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. 'फाऊंडेशन ऑफ एन्व्हायर्नमेंट एज्यूकेशन डेन्मार्क मार्फत लवकरच ही 'ब्लू फ्लॅग' सपूर्द केला जाणार आहे.
2/6
'फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थे
जागतिक पातळीवर स्वच्छ, सुंदर समुद्र आणि पर्यावरणपुरक किनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग' मानांकन दिले जाते. डेन्मार्क येथील 'फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थे 'मार्फत हे मानांकन दिले जाते. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटक सुरक्षा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा विविध निकषांवर आधारित दिला जातो
3/6
पाच समुद्र किनाऱ्यांची पहाणी
संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाने कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांची पहाणी केली होती. यात रायगड जिल्ह्यातील नागाव, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्हयातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघर जिल्ह्यातील पर्णका समुद्र किनाऱ्यांचा समावेश होता.
4/6
'ब्ल्यू फॅग' मानांकन
यातील तीन समुद्र किनाऱ्यांकडून सर्व निकषांची पूर्तता होत असल्याने त्यांना 'ब्ल्यू फॅग' मानांकन दिले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांकडे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास मदत होणार आहे.
5/6
८७८ किमी लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी
महाराष्ट्राला सुमारे ८७८ किमी लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. खास निसर्गसौंदर्य, स्वच्छता, जैवविविधता, ऐतिहासिक वारसा, स्थानिक संस्कृती आणि कोकणी खाद्यसंस्कृतीमुळे कोकण पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे.
6/6
आंतरराष्ट्रीय ओळख
तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला हा पुरस्कार महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा ठरणार आहे.