• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /कोल्हापुरात वर्षातून एकदाच घडतो अद्भूत चमत्कार! मोठे मोठे वैज्ञानिकही होतात अचंबित, 900 वर्ष जुन रहस्यमयी खिद्रापूर

कोल्हापुरात वर्षातून एकदाच घडतो अद्भूत चमत्कार! मोठे मोठे वैज्ञानिकही होतात अचंबित, 900 वर्ष जुन रहस्यमयी खिद्रापूर

Reported ByVanita Kamble
Published: Nov 26, 2026, 21:52 IST|Updated: Nov 26, 2026, 22:09 IST
joinshare
कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या जवळ असलेले कोपेश्वर मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर स्थापत्य केलेचा अद्धभूत नमुना मानले जाते.

Kolhapur Kopeshwar Mandir Khidrapur :  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्याच्या सीमेवरील खिद्रापूर या गावात वर्षातून एकदाच अद्भूत चमत्कार घडतो. खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर हे वास्तुकलेचा एक अजोड अद्वितीय नमुना आहे.   108 खांबावर उभ्या असेलल्या या मंदिराचे बांधकाम थक्क करणारे आहे.  वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास करुन या मंदिराची रचना करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेला स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी चंद्र येतो. 

maharashtra 1/8

महाराष्ट्रातील 900 वर्ष जुन मंदिर आजही संशोधकांना कोड्यात टाकत आहे. या मंदिराची रचना थक्क करणारी आहे. कोल्हापुरात असलेल्या या मंदिरात वर्षातून फक्त एकदाच मोठा चमत्कार पहायला मिळतो.

maharashtra 2/8

कोल्हापुरातील या अत्यंत प्राचीन मंदिराचे स्थापत्य विश्व प्रसिद्ध आहे. या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि भव्यता थक्क करणारी आहे.

maharashtra3/8

मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. 08 खांब असेलल्या या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची आहे. 108 खांब चार भागात विभागले गेले आहेत.

maharashtra4/8

स्वर्ग मंडप हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. हा स्वर्ग मंडप 48 खाबांवर उभा आहे. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या 3 वेगवेगळ्या रचना आहे. हा संपूर्ण मंडप विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा थक्क करणारा नमुना आहे.

maharashatra5/8

12 व्या शतकात म्हणजेच 1909 ते 1178 या काळात 'शिलाहार' राजवटीत हे मंदिर बांधले गेले आहे. या मंदिराचा समावेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे. याला महाराष्ट्रातील खजुराहो असे देखील म्हटले जाते. कोल्हापुरातील आई अंबाबाईच्या मंदिरा प्रमाणेच कोरीव काम असलेले हे खिद्रापूर येतील भगवान शंकराचे कोपेश्वर मंदिर पुरातन असून भौगोलिक आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करून बांधलेले आहे.

maharashtra6/8

दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरातील 48 दगडी खांबावर अभा असलेल्या स्वर्ग मंडपाच्या गोलाकार भागात रात्री बरोबर 12.30 वाजता पौर्णिमेचा सुपरमून स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी येतो. त्याचा कवडसा, चांदणे स्वर्ग मंडपातील जमिनीवर असलेल्या वर्तुळाकार दगडी ताटा सारख्या रंग शिळेवर पडतो. हा चंद्र प्रकाश जमिनीवरील या वर्तुळाकार शिल्पाशी अगदी तंतोतंत जुळतो. हा खगोलीय नजारा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक, खगोलप्रेमी आणि अभ्यासक येतात.

maharshtra7/8

हा स्वर्ग मंडप म्हणजे आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करून बांधलेला स्वर्ग मंडप आहे. या मंदिराच्या रचनेला ज्योतीषशास्त्रासोबत देखील जोडले जाते. 12 राशी आणि 27 नक्षत्र यांचा आकाशातील फिरण्याचा मार्ग हा या स्वर्ग मंडपावरूनच जातो असे सांगितले जाते. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री 11 वाजता स्वर्ग मंडपात चंद्र प्रवेश करतो. 12.30 वाजता चंद्र स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी येतो.

maharashtra tourisam8/8

कोल्हापूर पासून खिद्रापूर मंदिर 60 कि.मी.आहे. या मंदिरातील स्वर्ग मंडपाची रचना खगोल शास्त्राचा अभ्यास करून केलेली आहे. त्या काळात देखील तंत्रज्ञान किती प्रगत होते याचा पुरावा हे मंदिर आहे.

TAGS:
Maharashtra Tourism
Kolhapur

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.