अजय देवगण आणि काजोल राहत असलेल्या जुहू येथील 'शिवशक्ती' या प्रसिद्ध बंगल्याची किंमत अंदाजे 60 कोटी रुपये आहे. या बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. नेमकी ही कारवाई का करण्यात आली आङे जाणून घेऊयात...
मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई करण्यामागील खरं कारण समोर आलं आहे. नेमकं काय घडलं आणि का करण्यात आलंय हे पाडकाम जाणून घ्या सविस्तरपणे...
1/9
मुंबई महानगरपालिकेने का केली अजय देवगणच्या बंगल्यावर कारवाई?
अचानक हातोडा हातात घेऊन मुंबई महापालिकेचे कर्मचारी अजय देवगणच्या बंगल्यात शिरले आणि तोडकाम सुरु केलं. पण हे नेमकं प्रकरण काय जाणून घ्या सविस्तरपणे....
2/9
बांधकामाचा काही भाग पाडला
मात्र, नोटिशीनंतरही काम सुरू राहिल्याने पालिकेने अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाचा काही भाग पाडला आहे.
3/9
निर्देश देताना काय म्हटलेलं?
काम तातडीने थांबवून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
4/9
10 सप्टेंबर 2026 रोजी पाठवलेली नोटीस
मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354A अंतर्गत नोटीस बजावली होती.
5/9
काय काम केलं जात होतं?
या बंगल्यातील अंतर्गत बदल, विभाजनाच्या भिंती, खिडक्या आणि इतर कामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप आहे.
6/9
नोटीस देऊनही...
पालिकेने काम थांबवण्याची नोटीस देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिकेने बंगल्यातील काही बांधकाम पाडले आहे.
7/9
कुठे आहे हा बंगला?
अजय देवगणचा जुहू येथील कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. याच बंगल्यात अनधिकृत बांधकाम सुरु होतं.
8/9
आधीचे आणि नंतरचे फोटो समोर
या ठिकाणी बेकायदेशीररित्या बांधकाम केलं जात होतं असं सांगण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या कारवाई आधीचे आणि नंतरचे फोटो समोर आले आहेत. नेमकी काय कारवाई करण्यात आली ते फोटोंमधून पाहूयात...
9/9
मुंबई महापालिकेने कारवाई केली
प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.