टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंग आणि सिमरन कौर दोघेही एकमेकांना मागील काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता त्याने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
अर्शदीप सिंग आणि सिमरन कौर यांनी न्यूझीलंडमध्ये साखरपुडा केला आहे आणि आता त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
1/8
अर्शदीप सिंगचा साखरपुडा
टीम इंडियाचा स्टार वेगवाग गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, या वेळी त्याने आता त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये गर्लफ्रेड प्रपोज करुन गुपचुप साखरपुडा उरकला आहे.
2/8
हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया
अर्शदीप सिंगने शेअर केलेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने कपलला शुभेच्छा दिल्या आहेत, यामध्ये हार्दिकने लिहीले आहे की, अभिनंदन! देव तुम्हा दोघांना आशीर्वाद देवो.
3/8
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये हिऱ्याची अंगठीचा फोटो देखील शेअर केला आहे, या फोटोवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे.
4/8
सोशल मिडियावर शेअर केले खास फोटो
सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे आणि लाजताना देखील दिसत आहे. अर्शदीप देखील या फोटोमध्ये फारच खुश पाहायला मिळत आहे.
5/8
अभिनेत्रीने केला प्रेमाचा वर्षाव
अभिनेत्रीने सोशल मिडियावर फोटोखाली सुंदर कॅप्शन लिहीले आहे आणि ती म्हणाली की, आयुष्याने आपल्याला देऊ केलेल्या सर्व गोष्टींपैकी, मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की त्याने आपल्याला एकमेकांच्या रूपात एकमेकांना दिले. आपल्या एकत्र आयुष्यासाठी!
6/8
गुडघ्यावर बसून केला अर्शदीपने प्रपोज
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला हिऱ्याची अंगठी देत प्रपोज केला आहे. सध्या हे त्यांचे सोशल मिडियावर फोटो व्हायरल होत आहेत.
7/8
अर्शदीप सिमरनचा साखरपुडा
दोघांनीही सोशल मिडियावर याआधी देखील अनेक एकत्र फोटो टाकले होते आणि अधिकृत देखील केले होते, अनेकदा अभिनेत्री अर्शदीपला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये देखील दिसली होती.
8/8
साखरपुड्याचे फोटो व्हायरल
अभिनेत्री आणि मॅाडेल सिमरन कौर हिला मागील काही महिन्यांपासून डेट करत होता, आता दोघांनीही सोशल मिडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे.