शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मंदिरात आकर्षण रोषणाई केली आहे.
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होणार आहे.
1/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील एक कोल्हापुरातील श्री अंबाबाईचं मंदिर आहे. देशभरात शारदीय नवरात्रोत्सवचा तयारी सुरू आहे.
2/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून भाविक गर्दी करत असतात. नवरात्रीसाठी मंदिरात सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.
3/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
नयनरम्य, डोळ्याचे पारणे फेडणारी हे मंदिराचे रुप भाविकांना सुखद अनुभव देत आहे. असे हे मंदिराचे सुरेख रुप आम्ही तुमच्यासाठी आणणले आहेत.
4/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
घटस्थापनेनंतर मंदिराला आकर्षक रोषणाईसोबत फुलाची सजावट करण्यात येणार आहे. यासाठी झेंडू फुलांची आरास त्यासोबत देशविदेशातील खास जातीचे फुलांचीही सजावट करण्यात येत आहे.
5/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ज्यामुळे मंदिराचे सुंदरता अधिक वाढली आहे.
6/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
मंदिर परिसरात नवरात्रीदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून अनेक व्यवस्था करण्यात आली आहे.
7/8
आकर्षक विद्युत रोषणाई
भाविकांना अंबाबाईचे थेट दर्शन व्हावे यासाठी मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आलंय. शिवाय मंदिर परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर देखील असणार आहे.
8/8
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले असून ते पाहण्यासाठी नवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच भाविकांनी गर्दी केली आहे.