• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /हिवाळ्यात जम्मू काश्मीरला फिरायला जाताय? बॅगेत 'या' 6 गोष्टी ठेवायला विसरू नका

हिवाळ्यात जम्मू काश्मीरला फिरायला जाताय? बॅगेत 'या' 6 गोष्टी ठेवायला विसरू नका

Reported Bypooja pawar
Published: Nov 22, 2026, 14:23 IST|Updated: Nov 22, 2026, 14:27 IST
joinshare

Winter Packing Tips : नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळ्याच्या सीजनमध्ये अनेकजण जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी ट्रिपला जायचा प्लॅन करतात. मात्र अनेकांना तेथे उबदार कपड्यांशिवाय नेमकं काय घेऊन जावं याबाबत कल्पना नसते. तेव्हा अशा 6 गोष्टींबाबत जाणून घेऊयात ज्या हिवाळ्यात थंड प्रदेशात फिरायला जाताना सोबत न्यायलाच हव्यात. 

medicines 1/6

औषध :

जर तुम्ही हिवाळ्यात थंड प्रदेशात बर्फवृष्टी पाहण्यासाठी जाणार असाल, तर सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापासाठी आवश्यक औषधे सोबत ठेवायला विसरू नका. तसेच डोकेदुखीसारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळवून देणारे बामही सोबत ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बॅगेत 'सलाईन नेझल स्प्रे' किंवा ड्रॉप्स नक्की ठेवा. थंडीच्या हवामानात नाक बंद झाल्यास हे त्वरित आराम देतात.
mobile power bank 2/6

मोबाईल पॉवर बँक :

थंड हवामानात मोबाईल फोनची बॅटरी लवकर संपू शकते आणि तो चार्ज होण्यासाठी जास्त वेळही लागू शकतो. सतत फोटो काढल्याने किंवा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानेही बॅटरी अधिक वेगाने संपू शकते. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सोबत पॉवर बँक नक्की ठेवा.
lip blam 3/6

सनस्क्रीन आणि लीप बाम :

हिवाळ्यात थंड प्रदेशात जात असताना लहान सहान स्किन केअर प्रॉडक्ट सुद्धा सोबत ठेवा. जसं सनस्क्रीन, हाईड्रेटिंग लिप बाम आणि मॉइस्चराइजर. बर्फाळ प्रदेशांत, थंड हवेमुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते आणि विशेषतः तुमचे ओठ फाटू शकतात. तर काही भागात जर सूर्यप्रकाश अधिक तीव्र असेल तर त्यामुळे दर काही तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणे आवश्यक ठरते.
waterproof 4/6

वॉटरप्रूफ शूज :

हिवाळ्यात थंड आणि बर्फाळ प्रदेशात प्रवासासाठी बॅगेत सामान भरताना, तुमच्या सामानामध्ये वॉटरप्रूफ किंवा 'स्नो बूट्स' म्हणजेच बर्फात चालण्यासाठीचे बूट मिळतील. हे बूट अत्यंत उपयुक्त असतात. कारण ते बर्फात तुमचे पाय थंड होण्यापासून वाचवतात आणि त्यांची उत्तम पकड तुम्हाला निसरड्या पृष्ठभागावर घसरून पडण्यापासून रोखण्यास मदत करते.
thermal and scocks5/6

थर्मल अथवा वूलन सॉक्स :

तुमच्या बॅगेत थर्मल सॉक्सच्या दोन अतिरिक्त जोड्या नक्की ठेवा. कधीकधी बर्फाच्या बुटांमध्ये बर्फ शिरू शकतो, ज्यामुळे तुमचे पाय थंड पडू शकतात. म्हणूनच हे सॉक्स तुमच्या बॅगेत ठेवणे सोयीचे ठरेल. गरज पडल्यास तुम्ही ओल्या सॉक्सच्या जागी कोरड्या आणि स्वच्छ सॉक्सची जोडी वापरू शकता.
handgloves6/6

वॉटरप्रूफ हातमोजे :

बर्फाळ प्रदेशात जात असताना फक्त गरम हातमोजे नाही तर वॉटरप्रूफ हातमोजे ठेवणं गरजेचं आहे. बर्फात खेळल्याने गरम हातमोजे हे ओले होऊ शकतात मात्र वॉटरप्रूफ हातमोजे असतील तर पाण्यापासून त्याचा वाचावं होतो तसेच विंडप्रूफ असल्याने ते थंड हवेपासून सुद्धा बचाव करतात.
TAGS:
Lifestyle News
Marathi News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
बुलढाण्यातील सरपंचपुत्राचा दुर्दैवी मृत्यू, विहिरजवळ निसटलेला पाईप दुरुस्त करायला गेला अन्, धरणातच...

बुलढाण्यातील सरपंचपुत्राचा दुर्दैवी मृत्यू, विहिरजवळ निसटलेला पाईप दुरुस्त करायला गेला अन्, धरणातच...

2

W,W, W, W... T20 पदार्पण सामन्यात 4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा कोण आहे जमशेद आलम?

3

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेवटचं लोकेशन ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकासोबत घडलं भयंकर, 1200 फूट खोल दरीत...

4

कर्णधार गिलला ऋषभ पंतने दिली स्पिन बॉलिंगची ऑफर, यशस्वी जयस्वालला केलं ट्रोल

5

'तू इतर मुलांशी का बोलतेस?' 17 वर्षीय प्रेयसीला संपवलं; आधी गळा आवळला नंतर चाकूने...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.