- झी न्यूज मराठी
- /फोटो
- /सीएसएमटी - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, आता 'या' स्थानकातही थांबणार
सीएसएमटी - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, आता 'या' स्थानकातही थांबणार
Published: Oct 21, 2026, 01:45 PM IST|Updated: Oct 21, 2026, 01:52 PM IST
शिर्डी-मुंबई धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
(सीएसएमटी) ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या वंदे 'भारत बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
1/7सीएसएमटी - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, आता 'या' स्थानकातही थांबणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या वंदे 'भारत एक्स्प्रेसला आणखी एक ठिकाणी थांबा मंजूर झाला आहे.
2/7अधिकृत व्यावसायिक थांबा
सीएसएमटी ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या वंदे 'भारत एक्स्प्रेसला मनमाड जंक्शन येथे अधिकृत व्यावसायिक थांबा मंजूर झाला आहे.
3/7पत्राद्वारे माहिती
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली.
4/7जलद रेल्वे सेवेचा लाभ
मनमाडसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांतील प्रवाशांना मुंबई तसेच शिर्डीला ये-जा करण्यासाठी जलद रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.
5/7तांत्रिक कारणासाठी थांबा
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मनमाड स्थानकात तांत्रिक कारणासाठी थांबत होती. मात्र अधिकृत थांबा नव्हता.
6/7अधिकृत व्यावसायिक थांबा
अधिकृत व्यावसायिक थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या स्थानकावरून गाडीत चढता किंवा उत्तरता येत नव्हते.
7/7प्रवाशांना दिलासा
वंदे भारतला अधिकृत थांबा मंजूर झाल्यामुळे मनमाडसह मालेगाव, नांदगाव, चांदवड, सटाणा, देवळा, येवला आणि चाळीसगाव परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.