रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना 19 सप्टेंबर 2026 ला दुसरी मुलगी झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर आज या नवीन पालकाने लेकीचं नाव ठेवलं आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी आपल्या लेकीची घोषणा केली असून ते नाव अजून एका नावाजलेल्या अभिनेत्रीच्या लेकीचं नाव आहे.
1/8
दीपिका - रणवीरने ठेवलं लेकीचं नाव
दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या छोट्या लेकीचं नाव ठेवलं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी लेकीचं नाव तर ठेवलंच आहे, त्यासोबत लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
2/8
दुआ झाली मोठी बहीण
रणवीर आणि दीपिकाला पहिल मुलगी 8 सप्टेंबर 2024 मध्ये झाली होती. तिचं नाव या पालकांनी दुआ असं ठेवलं आहे. त्यामुळे छोट्या मुलीचं नाव काय ठेवणार हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
3/8
दसऱ्याच्या मुहूर्तावर लेकीचं नाव ठेवलं
दसरा हा क्षण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. हा सण देवी शक्तीचा सन्मान करण्याचा असतो. हीच गोष्ट लक्षात घेत दीपिका आणि रणवीरने छोट्या लेकीचं नाव ठेवलं आहे.
4/8
लेकीचं काय नाव ठेवलं?
दीपिका आणि रणवीर, दुआ आणि छोट्या लेकीसोबत फोटो शेअर करत त्यांनी लेकीच्या नावाची घोषणा केली आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, प्रेम आणि आनंदाने परिपूर्ण, देवी पदुकोण सिंग.
5/8
खास नावाची निवड
भारतीय संस्कृतीत देवी आणि देवी या नावाला विशेष महत्त्व आहे. हे नाव म्हणजे दैवी रूप, शक्ती, सौंदर्य, प्रतिष्ठा आणि स्त्री सामर्थ्यंचं प्रतीक मानलं जातं.
6/8
लेकीची पहिली झलक
त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका - रणवीर, दुआ आणि देवी हे सोनेरी कपड्यांमध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये दुआ आपल्या छोट्या बहिणीची गोड पापा घेतना दिसत आहे.
7/8
शुभेच्छांच्या वर्षाव
कुटुंबाचा हा गोड क्षण पाहूनही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत. मृणाल ठाकूर, शर्वरी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
8/8
या अभिनेत्रीच्या लेकीचं नाव आहे देवी
विशेष म्हणजे बिपाशा बसूच्या लेकीचं नावही देवी आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी झाली होती.