• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! स्कूल बस चालकांचा नवा नियम, शाळांचाही जाहीर पाठिंबा; 15 ऑक्टोबरपासून...

पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! स्कूल बस चालकांचा नवा नियम, शाळांचाही जाहीर पाठिंबा; 15 ऑक्टोबरपासून...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 09, 2026, 12:04 PM IST|Updated: Oct 09, 2026, 12:36 PM IST
joinshare
पालकांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली असून या वेळेस स्कूल बस चालकांच्या भूमिकेशी शाळांनाही सहमती दर्शवली असून तसं पत्रकच जारी केलं आहे. विशेष म्हणजे हा बदल 15 ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी भूमिका स्कूल बस चालकांनी घेतली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या सविस्तरपणे...

schoolbusfees1/9

पालकांचं टेन्शन वाढणार!

दिवाळीच्या आधीच पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून चालत आलेला एक नियम बदलतो आणि नवा नियम टेन्शनमध्ये टाकणार आहे. नेमका काय बदल होणार आहे पाहूयात...
schoolparents2/9

पालकांची गैरसोय

विशेषतः सहा महिन्यांचे बस शुल्क एक रकमी भरणाऱ्या पालकांना या नव्या नियमामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य एआय, वृत्तसंस्थांकडून साभार)
schoolparents3/9

पालकांसमोर पर्यायच नाही

शाळेच्या या निर्णयामुळे बस सेवा घेणाऱ्या पालकांना आता यूपीआय व्यवहाराऐवजी चेक किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागणार आहे.
schoolbus4/9

बस मालकांना सूट देण्याची मागणी

दरम्यान, या शुल्कातून शालेय बस मालकांना सूट देण्याची मागणी शाळांकडून करण्यात आली असून केंद्रीय अर्थमंत्र्यांना याबाबत ई-मेल पाठविण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
moneypayment5/9

आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याने

त्यामुळे पालकांनी सहा महिन्यांचे शालेय बस शुल्क यूपीआबद्वारे स्वीकारणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याने हे शुल्क चेक किंवा क्रेडिट कार्डद्वारेच भरावे, अशी सूचना शाळा व्यवस्थापनाने केली आहे.
upipayment6/9

काय दावा दावा करण्यात आलाय?

या परिपत्रकानुसार - नवीन सरकारी नियमांमुळे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारासाठी प्रति व्यवहार 200 रुपये शुल्क आकारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
schoolparents7/9

पालकांसाठी परिपत्रक जारी

त्यानुसार 15 ऑक्टोबरपासून बसचे शुल्क केवळ चेक किंवा क्रेडिट कार्डद्वारे स्वीकारली जाईल, असं 'स्कूल बस असोसिएशन'ने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शाळांनी पालकांसाठी - परिपत्रक जारी केले आहे.
upipayment8/9

शुल्क यूपीआयद्वारे स्वीकारणे बंद

दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी होत असल्याचे कारण देत शालेय बस मालक संघटना (एसबीओए) आणि शाळेने पालकांकडून शालेय बसचे शुल्क यूपीआयद्वारे स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
schoolparents9/9

पालकांना बसणार धक्का

यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणीचा फटका आता पालकांना बसण्याची दाट शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या आधीच शालेय बस संघटनांकडून एक नवा नियम अंमलात आणला जाण्याची दाट शक्यता आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य एआय, वृत्तसंस्थांकडून साभार)
TAGS:
Education News
Mumbai
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.