• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /महाराष्ट्रातील अनोखे गाव, 2 तास उशिरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त; इथं लोक घरात नाही तर गुहेत राहतात

महाराष्ट्रातील अनोखे गाव, 2 तास उशिरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त; इथं लोक घरात नाही तर गुहेत राहतात

Reported ByVanita Kamble
Published: Oct 15, 2026, 11:09 PM IST|Updated: Oct 15, 2026, 11:18 PM IST
joinshare
घनदाट जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगर कपारीत दडलेले अनोखे गाव. या गावात दिवस फक्त 6 तासांचा असतो.

Fofsandi Village Ahmednagar:  महाराष्ट्रात सर्वत्र एकाचवेळी सूर्योदय आणि सूर्यास्त होते. पुण्यापासून 130 KM अंतरावर एक अनोख गाव आहे जिथे  2  तास उशिरा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. या अतिदुर्गम गावात निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळतो. हे गाव इतकं सुंदपर आहे की इथं फिरताना एखाद्या सुंदर निसर्ग चित्रांचे फोटो प्रदर्शन पाहत असल्याचा भास होतो. इथले ग्रामस्थ अजूनही एका अनोख्या विश्वात जगत आहेत. इथंले ग्रामस्थ घरात नाही तर गुहेत राहतात. हे गाव म्हणजे ब्रिटीश अधिकाऱ्याने शोधलेले छुप हिल स्टेशन शोधलं.   
 

Fofsandi Village Ahmednagar1/9

दार्जिंलिगला टक्कर देणारे फोफसंडी गाव

महाराष्ट्रात एक असं अनोखे गाव जिथे 2 तास उशीरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. हे महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर गाव म्हणून ओळखले जाते. अद्याप हे गाव पर्यटकांपासून अलिप्त आहे. या गावात फिरताना दार्जिंलिगचा फिल येईल.
Fofsandi Village Ahmednagar2/9

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि 6 डोंगरांनी वेढलेले गाव

महाराष्ट्रातील हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून 6 डोंगरांनी वेढलेले आहे. चौफेर डोंगरामध्ये दरीत वसलेल्या या गावाचे नाव आहे फोफसंडी.
Fofsandi Village Ahmednagar3/9

उशीरा सूर्योदय आणि सूर्यास्त

जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदेवाचे दर्शन झालेले असते तेव्हा या गावात लोक उजाडण्याची वाट पाहत असतात. या गावात उशिराने सूर्यदर्शन होते. तर या गावात सूर्योदय देखील उशीराने होतो.
Fofsandi Village Ahmednagar4/9

इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी फोफसंडी गावात यायचा

या गावाला फोफसंडी हे नाव कसे पडले याचा इतिहास फारत रंजक आहे. भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात जात असे. तेव्हा पासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असे झाले.
Fofsandi Village Ahmednagar5/9

मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीत

मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. यामुळेच या गावाला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे.
Fofsandi Village Ahmednagar6/9

गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य

या गावात आल्यावर कुठे पाहिल्यावर एखाद्या चित्रकाराने काढलेले सुंदर निसर्गचित्र पाहत असल्याचा भास होतो. नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य या गावात आढळते.
Fofsandi Village Ahmednagar7/9

कोंबडकिल्ला- कुंजीरगडाच्या पायथ्याशी असलेले फोफसंडी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वायव्येला दुर्गम आदिवासी भागातील कोंबडकिल्ला- कुंजीरगडाच्या पायथ्याशी फोफसंडी हे गाव आहे. हे गाव घनदाट जंगलात आणि डोंगराच्या कुशीत दडलेले आहे.
Fofsandi Village Ahmednagar8/9

फोफसंडी गावात लोक गुहेत राहतात

फोफसंडी गावात काही कुटुंबे अजूनही त्यांच्या पाळीव प्राण्यांसह गुहेत राहतात. जंगली प्राण्यापांसून बचाव करण्यासाठी लोक गुहेत राहतात.
Fofsandi Village Ahmednagar9/9

फोफसंडी गावात जायचं कसं?

मुंबईतून ठाणे, कल्याण, मुरबाड आणि माळशेज घाट मार्गे अंदाजे 170 किमी अंतरावर हे गाव आहे. पुण्याहून जात असल्यास चाकण, मंचर, नारायणपूर आणि ओतूर मार्गे अंदाजे 130 किमी अंतरावर हे गाव लागते. नाशिकमधून गेल्यास सिन्नर आणि अकोले मार्गे 100 किमी अंतरावर फोफसंडी गाव लागते.
TAGS:
Maharashtra Tourism
Maharashtra News
Pune
Nashik

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.