• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /अनेक दशकांपासून कुटुंबाकडे असलेल्या ₹67 लाखांच्या दागिन्यांमुळे मुंबईकर महिला अडचणीत; आयकर विभागाने...

अनेक दशकांपासून कुटुंबाकडे असलेल्या ₹67 लाखांच्या दागिन्यांमुळे मुंबईकर महिला अडचणीत; आयकर विभागाने...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 07, 2026, 11:55 AM IST|Updated: Oct 07, 2026, 12:25 PM IST
joinshare
अनेक दशकांपासून कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या दागिन्यांमुळे मुंबईतील एक महिला चांगलीच अडचणीत आली. नेमकं घडलं काय आणि पुढे या प्रकरणाचं काय झालं जाणून घ्या सविस्तर...

वडिलोपार्जित संपत्तीमुळे एका मुंबईकर महिलेला कोणत्या अडचणींना समोरे जावे लागले, एकदा वाचाच...

goldnews1/9

₹67 लाखांचे वडिलोपार्जित दागिने अंगलट

एका महिलेला ₹67 लाखांचे वडिलोपार्जित दागिने अंगलट आल्याचा विचित्र प्रकार मुंबईमध्ये घडला आहे.
goldnews2/9

संपूर्ण वाढ रद्द

उपलब्ध कागदपत्रांची साखळी मालकी सिद्ध करण्यासाठी पुरेशी असल्याचे मानत न्यायाधिकरणाने ₹67.39 लाखांची संपूर्ण वाढ रद्द करून महिलेला दिलासा दिला.
goldnews3/9

कागदपत्रे ग्राह्य धरत

मात्र, या साऱ्या प्रकरणामध्ये मुंबईतील आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने जुन्या संपत्तीकर नोंदी, मूल्यांकन अहवाल आणि कुटुंबातील वाटपाची कागदपत्रे ग्राह्य धरत दागिन्यांवरील ही वाढ रद्द केली.
goldnews4/9

न्यायाधिकरणाचे निरीक्षण

केवळ संपत्तीकर विवरणपत्र नंतर दाखल झाले नाही म्हणून दागिने विकले गेले, असा निष्कर्ष काढता येत नाही. दागिने विकल्याचा किंवा त्यातून महिलेला रक्कम मिळाल्याचा स्वतंत्र पुरावाही विभागाकडे नव्हता.
goldnews5/9

कागदपत्रांनी दिला आधार

पारिख यांनी 1997-98चे संपत्तीकर विवरणपत्र, जुन्या मूल्यांकन अहवालांसह वारसाहक्काच्या नोंदी, 2014-15 मधील कुटुंबीय वाटपाची घोषणा आणि नोंदणीकृत मूल्यनिर्धारकाचा अहवाल सादर केला.
goldnews6/9

मोठा हिस्सा वडिलोपार्जित

पारिख यांनी दागिने अनेक दशकांपासून कुटुंबाच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यातील मोठा हिस्सा वडिलोपार्जित असून काही दागिने सासू-सासरे व इतर कुटुंबीयांकडून वारशाने मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
goldnews7/9

दागिने विकले किंवा हस्तांतरित केले असावेत, असा निष्कर्ष

विभागाच्या निदर्शनास आले की, याच दागिन्यांची नोंद 1997-98 च्या संपत्तीकर विवरणपत्रात होती. त्यानंतर विवरणपत्र दाखल झाले नसल्याने विभागाने दागिने विकले किंवा हस्तांतरित केले असावेत, असा निष्कर्ष काढला आणि त्यांची किंमत उत्पन्नात जोडली.
goldnews8/9

उत्पन्न ₹50 लाखांपेक्षा जास्त असल्याने...

अनजनी अशोक पारिख असे या महिलेचे नाव असून त्यांनी 2020-21 या वर्षाचे विवरणपत्र भरताना ₹67,39,949 चे दागिने जाहीर केले होते. उत्पन्न ₹50 लाखांपेक्षा जास्त असल्याने त्यांनी प्रथमच मालमत्ता व दायित्वांची माहिती देणाऱ्या अनुसूची 'एएल' मध्ये दागिन्यांचा तपशील नमूद केला. (फोटो एआयवरुन साभार)
goldnews9/9

वडिलोपार्जित दागिने जाहीर करणे महागात पडले

आयकर विवरणपत्रात ₹67.39 लाखांचे वडिलोपार्जित दागिने जाहीर करणे मुंबईतील एका महिलेला महागात पडले. आयकर विभागाने दागिन्यांच्या मालकीचा आणि स्रोताचा पुरेसा पुरावा नसल्याचे सांगत रक्कम करपात्र उत्पन्नात धरली. (सर्व फोटो प्रातिनिधिक, एआय तसेच वृत्तसंस्थांकडून साभार)
TAGS:
Gold Price
Mumbai
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.