/सोन्याचे दर पुन्हा कधी वाढणार? सध्या दरांमध्ये का होतेय घसरण? या दरांमध्ये पुन्हा किती वाढ होणार? तेव्हा सोन्याचा दर नेमका किती असणार? वाचा A To Z माहिती
सोन्याचे दर पुन्हा कधी वाढणार? सध्या दरांमध्ये का होतेय घसरण? या दरांमध्ये पुन्हा किती वाढ होणार? तेव्हा सोन्याचा दर नेमका किती असणार? वाचा A To Z माहिती
सोन्याच्या दरांमध्ये अचानक घसरण का होत आहे? सोन्याचे दर पुन्हा कधी वाढणार? सध्या गुंतवणुकदारांनी सोन्याकडे का पाठ फिरवली आहे? सोन्याच्या दरांना पुन्हा कधी झळाळी मिळणार? जाणून घ्या सविस्तरपणे...
दिवाळीनंतर सोन्याच्या दरांमध्ये रोज घसरण पाहायला मिळत आहे. असं का होतंय? यामागील कारणं काय आहेत? सोन्याचे दर पुन्हा कधी वाढणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या...
1/10
सोन्याचे दर पुन्हा कधी वाढणार?
सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण सुरु झाली असून ही कधी थांबणार? डिसेंबरपर्यंत दर कसे असणार? सोन्याचे दर कधी पुन्हा वाढणार? पुन्हा सोन्याला आधीची झळाळी कधी मिळणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या एकाच ठिकाणी...
2/10
पुन्हा सोन्याचे भाव कधी वधारणार?
दिवाळीनंतर सोन्याच्या दरांना घरघर लागली आहे. रोज सोन्याच्या दरामध्ये घट होत असतानाच आता पुन्हा सोन्याचे भाव कधी वधारणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर गोल्डमन सॅक्स या अंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेने दिलं आहे.
3/10
सोन्याचे दर फार का घसरणार नाहीत?
व्याजदराच्या दबावामुळे सोन्याचे दर खूप खाली घसरणार नाहीत, कारण जगभरातील विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी अजूनही सुरू आहे
4/10
तात्काळ मोठी तेजी येण्याची शक्यता कमी
गोल्डमन सॅक्सच्या या महिन्याच्या अहवालानुसार, सोन्याच्या दरात तात्काळ मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे. सद्यस्थितीत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या कठोर आर्थिक धोरणांमुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींवर दबाव कायम राहणार आहे.
5/10
सोन्याकडे पाठ का फिरवणार गुंतवणुकदार?
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचे धोरण सुरू ठेवल्याने डिसेंबर 2026 आणि मार्च 2027 मध्ये संभाव्य दरवाढ होणार असून गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी व्याज देणाऱ्या मालमत्तांकडे वाढला आहे.
6/10
कितीपर्यंत घसरणार सोन्याचे दर?
याच कारणामुळे पुढील काही काळ सोन्याच्या दरात चढ-उतार आणि काहीशी घसरण कायम राहण्याचा अंदाज आहे. गोल्डमन सॅक्सने डिसेंबर 2026 साठी सोन्याची लक्ष्य किंमत $4150 प्रति औंस इतकी घसरले असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी (1 तोळ्यासाठी) ₹1,26,301 पर्यंत घसरतील असा अंदाज आहे.
7/10
सोन्याची मागणी पुन्हा कधी वाढणार?
जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पुन्हा व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल, तेव्हाच पाश्चिमात्य देशांतील 'गोल्ड ईटीएफ'ची मागणी वाढेल आणि सोन्याच्या दरात मोठी तेजी येईल, असा गोल्डमन सॅक्स अंदाज आहे.
8/10
सोन्याचे दर कधीपासून वाढणार?
त्यामुळेच आजपासून वर्षभरामध्ये म्हणजेच 2027 अखेरपर्यंत सोन्याच्या किमतीत संथ गतीने सुधारणा झाल्याचं दिसू शकतं. या वर्षाच्या अखेरीस सोने $4650 ते $4800 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते. याचा अर्थ या काळात भारतात सोनं साधारण ₹1,41,518 ते ₹1,46,083 प्रती तोळ्यापर्यंत असू शकतं.
9/10
किती होणार सोन्याचा दर?
सोन्याला पूर्वीचा विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी आणखी दोन वर्षे लागू शकतात. 2028 सालाच्या शेवटापर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. 2028 च्या अखेरीस सोन्याचा दर $5600 प्रति औंस पर्यंत झेप घेईल, असा गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे. म्हणजेच हे दर भारतीय चलनानुसार, अंदाजे ₹1,70,430 प्रती तोळ्याच्या आसपास असतील.
10/10
अगदी थोडक्यात
अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 'गोल्डमन सॅक्स'नुसार सोन्याच्या दरात तात्काळ मोठी तेजी येण्याची शक्यता कमी असून, सोन्याची खरी मोठी वाढ आजपासून दोन वर्षांनी म्हणजेच 2028 च्या अखेरीस पाहायला मिळू शकते. (सर्व फोटो प्रातिनिधिक, वृत्तसंस्थांकडून साभार)