• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /हनुमान अंश 56 व्या दिवशीही करतोय कमाई! नीम करोली बाबांवरील चित्रपटाने गाठला 317 कोटींचा टप्पा, अजूनही कमाई सुरु

हनुमान अंश 56 व्या दिवशीही करतोय कमाई! नीम करोली बाबांवरील चित्रपटाने गाठला 317 कोटींचा टप्पा, अजूनही कमाई सुरु

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 02, 2026, 06:48 PM IST|Updated: Oct 02, 2026, 06:57 PM IST
joinshare
सॅकनिल्क' (Sacnilk) च्या आकडेवारीनुसार, 56 व्या दिवशी 'हनुमान अंश'ने 4345 शोमधून 2.85 कोटी रुपयांची निव्वळ (नेट) कमाई केली.

सॅकनिल्क' (Sacnilk) च्या आकडेवारीनुसार, 56 व्या दिवशी 'हनुमान अंश'ने 4345 शोमधून 2.85 कोटी रुपयांची निव्वळ (नेट) कमाई केली.
 

जागतिक स्तरावर एकूण कमाईचा आकडा 414 कोटी1/8

जागतिक स्तरावर एकूण कमाईचा आकडा 414 कोटी

विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 317.33 कोटी रुपयांच्या कमाईसह आपला आठ आठवड्यांचा प्रवास पूर्ण केला. जागतिक स्तरावर एकूण कमाईचा आकडा 414 कोटी रुपये इतका आहे.
आकडेवारीचा तपशील2/8

आकडेवारीचा तपशील

'सॅकनिल्क'च्या माहितीनुसार, 56 व्या दिवशी 'हनुमान अंश'ने 4345 शोमधून 2.85 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यामुळे भारतातील एकूण कमाई 374.80 कोटी रुपये आणि एकूण निव्वळ कमाई 317.33 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
जागतिक स्तरावरील एकूण कमाई 414.00 कोटी3/8

जागतिक स्तरावरील एकूण कमाई 414.00 कोटी

परदेशात, 56 व्या दिवशी चित्रपटाने 0.10 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे परदेशातील एकूण कमाई 39.20 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे जागतिक स्तरावरील एकूण कमाई 414.00 कोटी रुपये झाली आहे.
पहिल्या आठवड्यात फक्त 1.08 कोटींची कमाई4/8

पहिल्या आठवड्यात फक्त 1.08 कोटींची कमाई

पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 1.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अनुक्रमे 0.40 कोटी आणि 10.40 कोटी रुपयांची कमाई करत सर्व गणितच बदललं होतं.
सात आठड्यातील कमाईचा आकडा5/8

सात आठड्यातील कमाईचा आकडा

चौथ्या आठवड्यात चित्रपटाने 61 कोटी रुपये कमावले; त्यानंतर पाचव्या आठवड्यात 90.25 कोटी आणि सहाव्या आठवड्यात 80.25 कोटी रुपयांची कमाई झाली. सातव्या आठवड्यात चित्रपटाने 44.80 कोटी रुपयांची कमाई केली
सुरुवातीला प्रतिसाद नव्हता, मात्र नंतर सुपरहिट6/8

सुरुवातीला प्रतिसाद नव्हता, मात्र नंतर सुपरहिट

सुरुवातीला या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नाही. पण ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी त्याची चर्चा सुरू केली. चित्रपटाचा विषयही त्याला एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग मिळवून देतो. भारतात आणि परदेशात 'नीम करोली बाबा' यांचे मोठे अनुयायी आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अशा प्रेक्षकांशीही जोडला जाऊ शकतो, जे कदाचित मुख्य प्रवाहातील बॉलीवूड चित्रपटांचे नियमित प्रेक्षक नसतील.
नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित चित्रपट7/8

नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित चित्रपट

डॉ. विशाल चतुर्वेदी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'हनुमान अंश' हा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित एक चरित्रात्मक आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला चित्रपट आहे. हा चित्रपट डॉ. चतुर्वेदी यांच्या 'डिवाईन डिटूर: दॅट चेंज्ड माय लाईफ' (Divine Detour: That Changed My Life) या पुस्तकावर आधारित आहे. यात शोभिनव सत्या आणि चंदन आनंद यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
अनुप्रिया नगर या चित्रपटाच्या सर्वात तरुण निर्मात्यांपैकी 8/8

अनुप्रिया नगर या चित्रपटाच्या सर्वात तरुण निर्मात्यांपैकी

21 वर्षीय अनुप्रिया नगर या चित्रपटाच्या सर्वात तरुण महिला निर्मात्यांपैकी एक आहेत. नीम करोली बाबांच्या आशीर्वादावरील दृढ श्रद्धेपोटी त्यांनी या चित्रपटाच्या एकूण गुंतवणुकीपैकी एक-तृतीयांश हिस्सा स्वतःहून गुंतवला आहे.
TAGS:
Entertainment News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.