आठव्या वेतन आयोगात पेन्शन किती वाढू शकते? 2.10, 2.57 आणि 2.75 फिटमेंट फॅक्टरनुसार 25 हजार ते 75 हजार मूळ पेन्शनचे संभाव्य गणित जाणून घेऊया.
ही पेन्शनवाढ नेमकी किती असेल, हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे.
1/9
8th Pay Commission: तुमच्या पेन्शनमध्ये किती वाढ होईल? 50 हजार रुपये पेन्शन मिळवणाऱ्यांसाठी सोपे गणित!
केंद्र सरकारी निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नव्या वेतन आयोगामुळे पगारासोबतच पेन्शनमध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ नेमकी किती असेल, हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. सध्या 2.10, 2.57 आणि 2.75 अशा वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे संभाव्य पेन्शनचे गणित मांडलं जातंय. या आकड्यांनुसार 25 हजार रुपये मूळ पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन 52,500 रुपयांपासून 68,750 रुपयांपर्यंत जाऊ शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
2/9
पेन्शनधारकांच्या अपेक्षा
आठवा केंद्रीय वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्तीनंतरचे लाभ यांचा आढावा घेत आहे. त्यामुळे सध्या पेन्शन मिळणाऱ्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांनाही नव्या शिफारशींचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
3/9
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय?
फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ वेतनावर किंवा संबंधित गणना आधारावर लागू केला जाणारा गुणक. याच्या आधारे नवीन मूळ वेतन किंवा पेन्शन निश्चित करण्याचे गणित मांडले जाते. उदाहरणार्थ, 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर 25 हजार रुपयांच्या मूळ पेन्शनचे गणित 25,000 × 2.57 असे होईल. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जितका जास्त, तितकी गणनेतील नवीन रक्कम अधिक असते.
4/9
2.10 फिटमेंट फॅक्टरनुसार किती पेन्शन?
2.10 हा फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्यास सध्याच्या मूळ पेन्शनमध्ये संभाव्य बदल असा असेल:
- 25,000 रुपये → 52,500 रुपये
- 30,000 रुपये → 63,000 रुपये
- 40,000 रुपये → 84,000 रुपये
- 50,000 रुपये → 1,05,000 रुपये
- 75,000 रुपये → 1,57,500 रुपये
5/9
2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास?
सातव्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर वापरण्यात आला होता. हाच गुणक आठव्या वेतन आयोगात गृहीत धरल्यास संभाव्य आकडे असे असतील:
- 25,000 रुपये → 64,250 रुपये
- 30,000 रुपये → 77,100 रुपये
- 40,000 रुपये → 1,02,800 रुपये
- 50,000 रुपये → 1,28,500 रुपये
- 75,000 रुपये → 1,92,750 रुपये
6/9
2.75 फिटमेंट फॅक्टरचा पर्याय
2.75 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास 25 हजार रुपये मूळ पेन्शन असणाऱ्यांची संभाव्य रक्कम 68,750 रुपये होऊ शकते. त्याचप्रमाणे 30 हजारांची पेन्शन 82,500 रुपये, 40 हजारांची 1.10 लाख रुपये, 50 हजारांची 1.37 लाख 500 रुपये आणि 75 हजारांची 2 लाख 6 हजार 250 रुपये होऊ शकते.
7/9
सर्वाधिक पेन्शन कोणत्या गणनेत?
वरील तीन उदाहरणांची तुलना केली तर 2.75 फिटमेंट फॅक्टरमध्ये सर्वाधिक रक्कम दिसते. उदाहरणार्थ, 40 हजार रुपये मूळ पेन्शन असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याला 2.10 फॅक्टरनुसार 84 हजार, 2.57 नुसार 1 लाख 2 हजार 800, तर 2.75 नुसार 1 लाख 10 हजार रुपये मिळू शकतात.
8/9
सातव्या वेतन आयोगात काय झाले होते?
सातव्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टरचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी जुन्या पेन्शनधारकांसाठी पे मॅट्रिक्समधील काल्पनिक वेतन निश्चिती आणि सध्याच्या पेन्शनला 2.57 ने गुणण्याची पद्धत अशा पर्यायांचा विचार करण्यात आला होता. पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक लाभदायक पर्यायानुसार पेन्शन निश्चित करण्याची तरतूद होती. त्यामुळे आठव्या आयोगातही अंतिम पद्धत महत्त्वाची ठरणार आहे.
9/9
पेन्शनधारकांनी कोणती काळजी घ्यावी?
आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आयोगाला स्थापना झाल्यापासून 18 महिन्यांत शिफारशी सादर करायच्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकार या शिफारशींचा विचार करून अंमलबजावणीबाबत निर्णय घेईल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे पेन्शनवाढीचे आकडे निश्चित समजू नयेत. निवृत्त कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजन करताना अधिकृत घोषणा आणि पेन्शन निश्चितीचे अंतिम नियम येईपर्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.