बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांकडून देश सोडून जाण्याची नोटीस देण्यात आली आहे. अशातच इम्रानची संपत्ती किती आहे, देश सोडल्यानंतर त्या मालमत्तेचं काय होणार अशी चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा, इम्रान खान, पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा कुठल्या चित्रपटामुळे नाही. मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे तो चर्चेत आला आहे.
1/8
imran khan
इम्रान खानला मुंबई पोलिसांनी 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे ओसीआय कार्ड आहे.
2/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
इम्रान खानने अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. पण त्यापूर्वी त्याने चित्रपटांमधून मोठी संपत्ती कमावली आहे. एका अहवालानुसार अभिनेत्याकडे 100 कोटी संपत्ती आहे.
3/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
एवढंच नाहीतर मुंबई ते कर्जत इथे आलिशान घरं आहेत. तो बॉलिवूडमध्ये जेव्हा अभिनयाच्या शिखरावर असताना तो एका चित्रपटासाठी 7 कोटी मानधन घ्यायचा.
4/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
एका अहवालानुसार अभिनेत्याने एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन 12 कोटी रुपये घेतले होते. अभिनेता फक्त चित्रपटातून नाही तर विविध ब्रँड एंडोर्समेंटमधून भरीव उत्पन्न कमवतो. इम्रान विविध चित्रपट आणि वेब सिरीजच्या निर्मितीमधून पडद्यामागेही त्याने संपत्ती जमवली आहे.
5/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
कोका-कोला आणि लेवाइससारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये सहभागी होता. अहवालानुसार वार्षिक जाहिरात कमाईचा अंदाज सुमारे 1 कोटींच्या घरात आहे.
6/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
मुंबईतील पॉश पाली हिल परिसरात एक आलिशान बंगला होता. हो होता, कारण पत्नी अवंतिकापासून घटस्फोट झाल्यानंतर त्याने तो पत्नीला दिला. त्यानंतर तो वांद्रेतील एका छोट्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो.
7/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
शिवाय कर्जतमध्ये इम्रान खानचं एक मस्त टुमदार घर आहे. हिरवीगार झाडे, डोंगर आणि नैसर्गिक दृश्यांमध्ये वसलेले हे घराची झलक अभिनेत्याने 2024 मध्ये इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती.
8/8
घर आणि संपत्तीचं काय होणार?
इम्रान खानने 1988 मध्ये "कयामत से कयामत तक" या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1992 मध्ये आलेल्या "जो जीता वही सिकंदर" या चित्रपटात तो आमिर खानच्या बालपणीच्या भूमिकेत दिसला होता.