भारतीयांना कोणत्या देशाला भेट द्यायला आवडते? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र याचं उत्तर तुम्हाला थक्क करणारं आहे. आणि त्यापेक्षाही अधिक थक्क करणारी बाब म्हणजे भारतीयांकडून खर्च होणारी रक्कम...
भारतीय या देशात गेल्यानंतर सरासरी 28 दिवस मुक्काम करतात असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे. यासंदर्भातील सविस्तर आकडेवारी जाणून घ्या...
1/8
सरासरी मुक्काम किती दिवसांचा?
भारतातून ब्रिटनला जाणाऱ्या लोकांच्या भेटींमधील 51 टक्के भेटी मित्र आणि नातेवाईकांसाठी होतात. व्यावसायिक प्रवासासाठी 22 टक्के, तर सुट्टीसाठी जाणाऱ्यांचा वाटा 18 टक्के आहे. भारतीय पर्यटकांच्या ब्रिटनमधील मुक्कामातील 56 टक्के रात्री लंडनबाहेर घालवतात. तर एकूण सरासरी मुक्काम 28 रात्रीचा आहे.
2/8
फिरायचा ट्रेंड बदलला
भारतीयांकडून पर्सनलाइज सहलींना प्राधान्य दिलं जात असल्याने पर्यटकांमधील हा बदल लक्षात घेत ब्रिटनने आता नवीन धोरण अवलंबलं आहे. त्यांनी आपलं लंडनपुरते मर्यादित न ठेवता अन्य शहरांकडेही वळवलं आहे. चित्रपटांचे चित्रीकरण, फुटबॉल-क्रिकेटचे सामने, ऐतिहासिक वास्तू आणि खास सांस्कृतिक अनुभव यांचा पर्यटनाशी मेळ घालण्याची रणनीती आखण्यात आली असून त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळताना दिसतंय.
3/8
पर्यटक संख्या किती झाली?
युद्धजन्य वातावरणामुळे 2026 मध्ये ब्रिटनला भारतातून भेट देणाऱ्यांची संख्या साधारण सहा लाखांवर आली आहे, परंतु, ब्रिटनमधील पर्यटनावर भारतीयांनी केलेल्या एकूण खर्चाचा आकडा तब्बल 86.5 कोटी पौंड (10935 कोटी रुपये) इतका जास्त आहे. गेल्या वर्षी हाच आकडा 87.5 कोटी पौंड इतका होता.
4/8
पर्यटक कमी झाले पण खर्च नाही
2025 च्या तुलनेत ब्रिटनला जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 2026 मध्ये केवळ सात टक्क्यांची घट झाली आहे. प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी परदेश दौऱ्यात भारतीय लोक सढळ हस्ते खर्च करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ब्रिटनच्या पर्यटन क्षेत्रातील मुंबई आणि महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. पर्यटक संख्येच्या तुलनेत ब्रिटनमध्ये पर्यटनाकरिता झालेल्या खर्चात अत्यंत अल्प म्हणजे अवघी 1.1 टक्के इतकीच घट झाली आहे. भू-राजकीय अस्थिरतेचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर दिसत असला तरी ब्रिटनच्या पर्यटनातून होणाऱ्या कमाईवर परिणाम झालेला नाही.
5/8
हा देश कोणता?
भटकंतीसाठी भारतीय पर्यटकांनी ब्रिटनला पहिली पसंती यंदाही दिली आहे. मागील वर्षभरात म्हणजेच 2025 मध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी तब्बल 6 लाख 39 हजार भारतीयांनी भेट दिली आहे. या भेटींमागील कारणं वेगवेगळी आहेत. कधी पर्यटन, कधी व्यापार, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना भेटणं यासारख्या गोष्टींसाठी अनेक भारतीयांच्या ब्रिटनच्या फेऱ्या झाल्यात.
6/8
भविष्यासाठी प्लॅनिंग
सध्या ब्रिटनने क्रीडा, चित्रपट आणि सांस्कृतिक पर्यटनावर भर दिला असून 2030 पर्यंत भारतीय पर्यटकांची संख्या 9.59 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही वाढ आजच्या तुलनेत 61 टक्के असू शकते असा अंदाज आहे. तर भारतीय लोक ब्रिटन पाहण्यासाठी पुढील चार वर्षात 150 कोटी पौडांपर्यंत खर्च करु शकतील असंही मानलं जात आहे.
7/8
भारतीयांच्या पहिल्या पसंतीचा देश
भारतीय पर्यटक भटकंतीसाठी पहिली पसंती कोणत्या देशाला देतात असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तर समोर येतील. मात्र भारतीयांनी कोणत्या देशामध्ये फिरण्यासाठी भरपूर पैसा खर्च केलाय असं विचारलं तर अनेकजण गोंधळून जातील. पण आता या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. मिडल ईस्ट म्हणजेच मध्य पूर्वेतील भू-राजकीय अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर प्रतिकूल परिणाम झालेल्याचं दिसून आलं आहे. असं असतानाही भारतीयांना एका देशाने भूरळ पाडली आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. सौजन्य फ्री-पिकवरुन साभार)
8/8
भारतीय पर्यटकांचा आवडता देश...
भारतीयांनी या एकाच देशामध्ये तब्बल ₹10935 कोटी खर्च केलेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जाणून घ्या हा देश कोणता आणि इथं भारतीय एवढ्या मोठ्या प्रमाणात जाऊन खर्च का करतात...