मागील काही दिवसांपासून आयफोन 18 प्रो सिरीजची चर्चा पाहायला मिळत आहे, पण प्रो सिरीजची किंमत अनेकांना न परवडणारी आहे. पण आता आयफोन 18 खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
जर तुम्ही आयफोन 18, आयफोन 18ई किंवा आयफोन एअर 2 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऍपल आता 2027 च्या सुरुवातीला हे फोन लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. एका लीकमुळे त्यांची संभाव्य वैशिष्ट्ये आणि भारतातील किंमत समोर आली आहे.
1/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
लाइव्ह मिंटच्या एका अहवालानुसार, स्टँडर्ड आयफोन 18 मध्ये अनेक अंतर्गत अपग्रेड्स पाहायला मिळू शकतात, तर त्याचे डिझाइन मागील मॉडेलसारखेच राहण्याची शक्यता आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
जर तुम्ही आयफोन 18, आयफोन 18ई, किंवा आयफोन एअर 2 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
मिळालेल्या माहितीनुसार, ऍपल 2027 च्या सुरुवातीला नवीन आयफोन मॉडेल्स लॉन्च करण्याची शक्यता आहे, आणि या आगामी लाइनअपमध्ये स्टँडर्ड आयफोन 18, परवडणारा आयफोन 18ई, आणि दुसऱ्या पिढीचा आयफोन एअर 2 यांचा समावेश असू शकतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
ऍपलने सप्टेंबर 2026 मध्येच आपली प्रीमियम आयफोन लाइनअप सादर केली होती, ज्यामध्ये आयफोन 18 प्रो मॉडेल्स आणि त्याचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन ड्युओ यांचा समावेश होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
आता, कंपनी उर्वरित मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहे, जे फेब्रुवारी ते एप्रिल २०२७ दरम्यान एका वेगळ्या स्प्रिंग लॉन्च इव्हेंटमध्ये सादर केले जाऊ शकतात. असे म्हटले जाते की हा लॉन्च मार्चमध्ये होऊ शकतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
या स्मार्टफोनमध्ये 1.5 के रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ प्रोमोशन रिफ्रेश रेट असलेला 6.3-इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. ऍपल पातळ बेझल्स आणि सुधारित स्क्रीन ब्राइटनेसदेखील देऊ शकते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
आयफोन 18e हा अशा ग्राहकांसाठी असल्याचे मानले जाते, ज्यांना मोठी किंमत न मोजता ॲपलच्या इकोसिस्टमचा आणि नवीन प्रोसेसिंग हार्डवेअरचा अनुभव घ्यायचा आहे. डिझाइनमध्ये मोठे बदल करण्याऐवजी, हा पुढच्या पिढीचा परवडणारा आयफोन प्रामुख्याने परफॉर्मन्स आणि बॅटरी लाईफ सुधारण्यावर लक्ष केंद्रित करेल अशी अपेक्षा आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
iPhone 18, 18e आणि Air 2 ची किंमत लीक
या डिव्हाइसमध्ये ॲपलचा A20 प्रोसेसर असेल असे म्हटले जाते, जोच चिपसेट स्टँडर्ड आयफोन 18 मध्ये देखील वापरला जाण्याची शक्यता आहे. यात ॲपलचा C2 मॉडेम आणि 8GB ते 9GB रॅम असू शकते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया