करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली.
यावेळी त्यांनी हल्ल्याच्या रात्री नेमकं काय झालं होतं यावर भाष्य केलं.
1/9
'कॉफी विथ करण'मध्ये सैफ-करीनाची हजेरी
'कॉफी विथ करण' शोमध्ये नुकतीच करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांनी आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यासंदर्भात अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान यावेळी त्यांनी सैफवर झालेल्या हल्ल्याबद्दलही सांगितलं.
2/9
हा कट कसा असू शकतो...
करीना कपूर म्हणाली, "मला हे 'कट' (conspiracy) असल्याचं बोलणं अजिबात समजत नाहीये. याचा अर्थ असा का की, पोलिसांनी दोषी व्यक्तीला पकडलं म्हणून तेही आमच्यासोबत या कटात सामील होते? म्हणजे काय, पोलीसही या कटाचा भाग आहेत का?"
3/9
मुलाने हॉस्पिटमध्ये नेलं
सैफने सांगितलं की, अनेकांना ड्रायव्हर का नव्हता असा प्रश्न पडला होता. पण काम संपल्याने तो घरी गेला होता. आमचा मुलगा सैफसोबत आणि आमच्या घरकाम करणाऱ्या हरीसोबत हॉस्पिटलमध्ये गेला होता. लोकांनी अशा गोष्टींचा विचार करावा, हे खरोखरच खूप भयानक आहे.
4/9
मी रस्त्यावर रिक्षासाठी ओरडत होते
"मी नाईट टी-शर्ट घातलेल्या अवस्थेत रस्त्यावर उभी राहून रिक्षा शोधण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने, कोणाचेही लक्ष त्याकडे गेले नाही किंवा कोणीही त्याचा व्हिडीओ काढला नाही. मी वेड्यासारखी ओरडत इकडे-तिकडे धावत होते," अशी आठवण करीनाने सांगितील.
5/9
'अब्बा, तुम्ही मरणार आहात का?'
"सैफ पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. लिफ्टमध्ये जेव्हा मी सैफला पाहिले, तेव्हा मी त्याला विनंती केली, 'कृपया, असं काही करू नकोस.' (मरु नकोस) आणि तेव्हाच, छोटा 'टिम' (तैमूर) विचारू लागला, 'अब्बा, तुम्ही मरणार आहात का?'," अशी माहिती तिने दिली.
6/9
चाकू तुटल्याने पाठीत राहिला
सैफने सांगितले की, त्याच्या मानेवर खोल जखम होती. तसंच पाठीत चाकू तुटल्याने त्याचा भाग होता. पण या कठीण प्रसंगात तो शांत राहिला. यावेळी त्याने मस्करीत बोलताना तो अत्यंत खराब चाकू होता, नाहीतर मेलो असतो असं म्हटलं. मात्र मुले हे सर्व पाहत असल्याने त्याने अत्यंत संयमाने स्थिती हाताळली.
7/9
"मी पूर्णपणे खचून गेले होते"
करीना म्हणाली की, सैफ इतका गंभीर जखमी झाला होता की तो चालूही शकत नव्हता. त्याच्या पाठीच्या कण्यातून सुरी काढण्यासाठी नसांना बाजूला करावे लागले होते. ती म्हणाली, "मी पूर्णपणे खचून गेले होते."
8/9
मुलाने खेळण्यातील तलवार दिली भेट
करीनाने पुढे सांगितले की, त्यांचा धाकटा मुलगा जेह याने ही संपूर्ण घटना पाहिली होती आणि भविष्यात सैफ सुरक्षित राहावा, म्हणून त्याने त्याला आपली स्वतःची प्लास्टिकची खेळण्यातील तलवार दिली. जेह, सैफकडे एका 'आयर्न मॅन'च्या रूपात पाहतो.
9/9
नेमकं काय झालं होतं?
16 जानेवारी 2025 च्या रात्री उशिरा, एक घुसखोर सैफ अली खानच्या घरात शिरला आणि त्याने सैफवर सुरीने हल्ला केला. सैफच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर त्याला काही दिवस रुग्णालयात राहावे लागले.