अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
यानिमित्ताने करीना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
1/8
करीना-सैफच्या लग्नाची14 वर्ष
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते. त्याआधी पाच वर्ष त्यांनी एकमेकाला डेट केलं.
2/8
फोटोतून मांडला 14 वर्षांचा प्रवास
यानिमित्ताने करीना कपूरने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत आपला 14 वर्षांचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
3/8
इंस्टाग्रामला शेअर केले फोटो
करीना कपूरने सुट्ट्यांपासून ते तैमूर जेह यांच्यापर्यंतचे फोटो तिने इंस्टाग्रामला शेअर केले आहेत.
4/8
अजून खूप प्रवास बाकी
'अजून एक वर्ष संपलं, अजून खूप प्रवास बाकी आहे,' असं करिनाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
5/8
सैफ अली खानची कमेंट
करिनाच्या पोस्टवर सैफ अली खाननेही कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “जवळजवळ परिपूर्ण, पण काहीतरी कमी आहे... आता झालं, अगदी परिपूर्ण!!! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असं त्याने लिहिलं आहे.
6/8
टशनच्या शुटिंगदरम्यान वाढली जवळीक
'टशन' (2008) चित्रपटाच्या शुटिंगदर्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांचा विवाहसोहळा नोंदणीकृत पद्धतीने अत्यंत खाजगीरीत्या, वांद्रे येथील सैफच्या निवासस्थानी पार पाडला. त्यानंतर त्यांनी संगीत, निकाह आणि रिसेप्शन अशा पारंपरिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले होते.
7/8
'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 5' मध्ये झळकणार
लवकरच हे दोघेही 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 5' वर . कॉमेडी शोमध्ये दिसणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो प्रसारित होणार आहे.
8/8
कपिल शर्माने केलं कौतुक
कपिल शर्माने लग्नाला सुमारे 14 वर्षे असूनही तरुण दिसल्याबद्दल दोघांचे कौतुक केले. सैफने करीनाच्या झोपण्याच्या वेळेबद्दल सांगितले तेव्हा चर्चेला लवकरच एक मजेदार वळण मिळाले. त्याने उघड केले की अभिनेत्री झोपण्यापूर्वी तिच्या पायाला तूप चोळते, ही सवय तिला आराम करण्यास मदत करते असे करीना म्हणाली.