kiran baliyan banned : डोपिंग प्रकरणी भारतीय खेळाडूला दोषी ठरण्यात आल्याच्या काही घटना घडल्या होत्या. पुन्हा एकदा एक अशीच घटना समोर आली असून भारतीय खेळाडू किरण बालियान हिच्यावर डोपिंग प्रकरणी आठ वर्षांचा बॅन लावण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा विश्वाला एक झटका बसला आहे.
1/6
Kiran Baliyan
भारतीय क्रीडा विश्वातून पुन्हा एकदा डोपिंग प्रकरण समोर आलं असून एशियन गेम्समध्ये पदक विजेत्या एका स्टार खेळाडूने आपल्या कृतीने संपूर्ण देशाला मान खाली घालावी लागली आहे.
2/6
Kiran Baliyan
एशियन गेम्स 2022 मध्ये विमेंस शॉट पुटमध्ये कांस्य पदक पटकावणारी किरण बालियान हिला अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन करण्यासाठी दोषी आढळण्यात आलं आहे. यासाठी तिच्यावर 8 वर्षांची बॅन लावण्यात आला आहे.
3/6
Kiran Baliyan
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) ने किरण बालियानला 2 प्रकरणात दोषी आढळलं आहे. तिच्यावर 4-4 वर्षांचा बॅन लागला आहे. हा बॅन 2024 पासून ते 2032 पर्यंत लावण्यात आला आहे.
4/6
Kiran Baliyan
2024 मध्ये 'मेथँडिएनोन' या प्रतिबंधित स्टिरॉइडच्या वापराच्या संदर्भात किरणवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. जो निर्णय नंतर कायम ठेवण्यात आला. याव्यतिरिक्त, नमुन्याशी छेडछाड केल्याप्रकरणीही किरण बालियान दोषी आढळली आहे.
5/6
Kiran Baliyan
चीनमधील हांगझू येथे 2023 मध्ये आयोजित 2022 च्या एशियन गेम्स स्पर्धेत किरणने 7.36 मीटर अंतरापर्यंत गोळा फेकून कांस्यपदक जिंकले आणि या क्रीडा प्रकारात भारताचा 72 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.
6/6
Kiran Baliyan
किरण बलियान ही उत्तर प्रदेशातील शॉट पुट (गोळा फेक) खेळाडू असून तिचा जन्म हा 6 मार्च 1999 रोजी झाला होता. तिने 2014 मध्ये मेरठ येथे आपल्या शॉट पुट कारकिर्दीची सुरुवात केली.