IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला टेस्ट सामना खेळवला जात आहे. रविवारी पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने जबरदस्त खेळी करून शतक ठोकलं. ऋषभ पंतने 135 बॉलचा सामना करून शतक पूर्ण केलं, त्यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. ऋषभ पंतच्या टेस्ट करिअरमधील हे 9 वं शतक होतं तर न्यूझीलंड विरुद्ध त्याने प्रथमच टेस्ट क्रिकेटमध्ये शतक ठोकलं.
जेव्हा ऋषभ पंत 133 बॉलमध्ये 95 धावांवर पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या खास शैलीत शतक पूर्ण केले. पुढच्या दोन बॉलवर त्याने एक चौकार आणि त्यानंतर एक षटकार लगावला. अशा प्रकारे, त्याने 135 बॉलमध्ये शतकाचा टप्पा ओलांडला. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील शेवटच्या बॉलवर तो रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्याची खेळी संपुष्टात आली. त्याने एकूण 153 बॉलचा सामना करत 128 धावा केल्या, त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय विकेटकिपर :
न्यूझीलंडविरुद्धचे हे ऋषभ पंतचे पहिले टेस्ट शतक असून, न्यूझीलंडच्या भूमीवरचेही त्याचे हे पहिलेच शतक आहे. तो असा पहिला भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. आणि कुमार संगकारांनंतर आशियातील केवळ दुसरा खेळाडू ज्याने सर्व 'SENA' देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) टेस्ट शतक झळकावले आहे.
असा करणारा सहावा भारतीय :
ऋषभ पंत हा सर्व SENA देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे केएल राहुलने वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या टेस्ट सामन्यादरम्यान हा टप्पा गाठला.