• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /रविवार ठरणार ब्लॉकबस्टर! भारत - पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने; तिलक, वैभव, रिंकू यंग ब्रेगेड करणार पाकशी भिडणार

रविवार ठरणार ब्लॉकबस्टर! भारत - पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने; तिलक, वैभव, रिंकू यंग ब्रेगेड करणार पाकशी भिडणार

Rising Star Asia Cup 2026 IND VS PAK : इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए हे संघ राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेत रविवार 22 नोव्हेंबर रोजी आमने सामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताच लक्ष असून यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. .

Reported Bypooja pawar
Published: Nov 21, 2026, 13:05 IST|Updated: Nov 21, 2026, 13:44 IST
joinshare
रविवार ठरणार ब्लॉकबस्टर! भारत - पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने; तिलक, वैभव, रिंकू यंग ब्रेगेड करणार पाकशी भिडणार
Image Credit: भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना कुठे पाहाल Live?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

2

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

3

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

4

महाराष्ट्र गारठला! वातावरणात मोठा बदल, समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्राकार वारे, थंडीचा कडाका वाढणार

5

ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध ठोकलं शतक, टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

 Rising Star Asia Cup 2026 IND VS PAK : राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 या स्पर्धेला सुरुवात झाली असून यात टीम इंडियाची यंग ब्रिगेड सध्या भारताचं प्रतिनिधित्व या इंडिया ए संघात करतेय. तिलक वर्माच्या नेतृत्वात इंडिया ए संघ या स्पर्धेत खेळत असून शुक्रवारी इंडिया ए चा पहिला सामना हा नेपाळ विरुद्ध झाला. या सामन्यात इंडिया ए ने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून पाकिस्तानला विजयासाठी 333 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात नेपाळ अयशस्वी ठरली आणि फक्त 26 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे नेपाळ विरुद्ध इंडिया ए संघाचा 306 धावांनी विजय झाला. आता इंडिया ए चा पुढील सामना पारंपरिक विरोधी असलेल्या पाकिस्तान ए संघाशी होणार आहे. रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी हा सामना पार पडणार असून या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार याविषयी जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए :

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए या संघात राइजिंग स्टार्स आशिया कप 2026 चा ग्रुप स्टेज सामना पार पडणार आहे. रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी हा सामना होणार असून दुपारी 3: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडेल. एशियन टाऊन क्रिकेट स्टेडियम कतार येथे हा सामना पार पडणार आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वात इंडिया ए संघ खेळायला उतरेल तर दुसरीकडे अब्दुल समदच्या नेतृत्वात पाकिस्तान ए संघ मैदानात येईल.

कुठे पाहू शकता सामना?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए संघाचा सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनलवर तर मोबाईल आणि डिजिटल गॅजेटचे यूजर्स सोनी लिव्ह अँपवर या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा : Asia Cup : भारत - पाकिस्तान सामना रद्द, पाकच्या क्रिकेट संघाला मिळाली ट्रॉफी, खेळाडूंनी टीम इंडियाला डिवचण्यासाठी केलं प्लेन क्रॅश सेलिब्रेशन

इंडिया ए संघ :

तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुश कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव, अरशद खान, आयुष बडोनी

पाकिस्तान ए संघ :

अब्दुल समद (कर्णधार), अहमद दानियाल, अली रझा, दानिश अझीझ, फरहान युसफ, हैदर अली, हसन नवाज, माझ सदाकत, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इम्रान रंधावा, रोहेल नजीर (विकेटकिपर), साद मसूद, शाहजैब खान, शमिल हुसैन आणि सुफयान मोकीम

इंडिया ए च्या सामान्यांचं वेळापत्रक :

इंडिया ए विरुद्ध नेपाल : 20 नोव्हेंबर 2026 
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए : 22 नोव्हेंबर 2026
इंडिया ए विरुद्ध यूएई : 24 नोव्हेंबर 2026

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india