• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /Asia Cup : भारत - पाकिस्तान सामना रद्द, पाकच्या क्रिकेट संघाला मिळाली ट्रॉफी, खेळाडूंनी टीम इंडियाला डिवचण्यासाठी केलं प्लेन क्रॅश सेलिब्रेशन

Asia Cup : भारत - पाकिस्तान सामना रद्द, पाकच्या क्रिकेट संघाला मिळाली ट्रॉफी, खेळाडूंनी टीम इंडियाला डिवचण्यासाठी केलं प्लेन क्रॅश सेलिब्रेशन

IND VS PAK Blind Asia Cup 2026 : पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये पावसामुळे भारत - पाकिस्तान फायनल सामना रद्द झाला. त्यानंतर पाकिस्तान संघाला विजयी घोषित करून त्यांना विजेतेपदाची ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली.

Reported Bypooja pawar
Published: Nov 21, 2026, 09:38 IST|Updated: Nov 21, 2026, 10:44 IST
joinshare
Asia Cup : भारत - पाकिस्तान सामना रद्द, पाकच्या क्रिकेट संघाला मिळाली ट्रॉफी, खेळाडूंनी टीम इंडियाला डिवचण्यासाठी केलं प्लेन क्रॅश सेलिब्रेशन
Image Credit: भारत - पाकिस्तान सामना रद्द, पाकच्या क्रिकेट संघाला मिळाली ट्रॉफी

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

2

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

3

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

4

महाराष्ट्र गारठला! वातावरणात मोठा बदल, समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्राकार वारे, थंडीचा कडाका वाढणार

5

ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध ठोकलं शतक, टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS PAK Blind Asia Cup 2026 : पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी अंतिम सामना खेळवला जाणार होता. मात्र ढाका येथे पावसाची संततधार सुरूच राहिल्याने सामन्याचा टॉस सुद्धा होऊ शकला नाही. त्यानंतर चांगल्या रन रेटच्या आधारे पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांना विजेतेपदाची ट्रॉफी सुद्धा सुपूर्द करण्यात आली. मात्र टीम इंडियाने या निर्णयाचा विरोध केला आणि ट्रॉफी सेरेमनीवर बहिष्कार टाकला. या सगळ्यानंतर पाकिस्तानच्या ब्लाइंड खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारताना भारताला डिवचणारे सेमीब्रेशन केले. त्यांनी प्लेन क्रॅशचं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेट रन रेटच्या आधारावर घेतला गेला निर्णय :

माध्यमांशी बोलताना क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाचे सचिव शैलेंद्र यादवने सांगितलं की, 'या वादावर जोपर्यंत कोणता तोडगा काढला जात नाही. तोपर्यंत भारताचा ब्लाइंड संघ हा पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार नाही. रिपोर्ट्सनुसार WBCC च्या टेक्निकल कमिटीने फायनल रद्द झाल्यावर भारत आणि पाकिस्तानला संयुक्त विजयी घोषित करण्यात सहमती दर्शवली होती.

मात्र वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट काउंसिलचे प्रमुख सुलतान शाहवर समितीचा निर्णय पलटवण्याचा आरोप आहे. ज्यांनी रेफरीला निर्देश दिले आणि पाकिस्तान संघाला चॅम्पियन घोषित करण्यात आले.  हा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर घेतला गेला ज्यात पाकिस्तानचा संघ हा भारताच्या पुढे होता.

हेही वाचा : हार्दिक पांड्याच्या येण्याने पंजाब किंग्सला कसा होणार फायदा? काय म्हणाला कोच रिकी पॉन्टिंग?

Pakistan's blind cricket team was declared the winner after the final was abandoned, without even playing the match. Look at their gestures, They are doing exactly what the Pakistani men's team and Haris Rauf did during last year's Asia Cup. https://t.co/q0nBlpnXQ2

November 20, 2026

The trophy was awarded to Pakistan without the final being played. WBCC President and Pakistan Blind Cricket Council President Sultan Shah overruled the WBCC Technical Committee’s decision to declare joint winners, forcing the match referee to announce the same decision. https://t.co/XHoRsSo48D

 Cricket Association for the Blind in India (CABI) (blindcricket) November 20, 2026

  नेट रन रेटच्या आधारावर पाकिस्तानला चॅम्पियन बनवल्यामुळे भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाचं म्हणणं होतं की नेट रन रेटने विजेता ठरवण्याचा निर्णय हा जर फायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर त्यासाठी लागू होत नाही. रिपोर्ट्समध्ये एका अधिकाऱ्याने फायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व डे नाही याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्याने म्हंटलं की,  'कोणत्याही स्पर्धेत अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस असतो. अन्यथा दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाते. पात्रता फेरीसाठी 'नेट रन रेट'चा विचार केला जातो, परंतु अंतिम सामन्यासाठी तो विचारात घेतला जात नाही'.

पाकिस्तान ब्लाइंड संघाचं वादग्रस्त सेलिब्रेशन :

पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यावर ज्याप्रकारे सेलिब्रेशन केलं त्याच्यावर सध्या टीका केली जात आहे. खेळाडूंनी ट्रॉफी उंचावल्यावर प्लॅन क्रॅश केल्या सारखा इशारे केले. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना पाकिस्तानने खोटं पसरवलं होतं की पाकिस्तानला भारतीय विमान पाडण्यात यश आलं. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नव्हतं. मात्र तरी देखील पाकिस्तानचे खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये भारताला डिवचण्यासाठी अशा प्रकारचे इशारे करतात. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india