कोकणामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पर्यटक येतात. मात्र निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत घडणाऱ्या दुर्घटनाही इथं चिंता वाढवणार विषय आहे. त्याचबद्दलची आकडेवारी...
कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांना कोणता समुद्रकिनारा ठरतोय घातक? नेमकी काय माहिती समोर आलीये पाहूयात...
1/9
कोकणामधील हा जिल्हा ठरतोय डेथ ट्रॅप
समुद्र किनाऱ्या पर्यटक बुडण्याच्या घटनासंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात... (सर्व फोटो प्रातिनिधिक; सौजन्य - रॉयटर्स, सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
2/9
निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येतात पर्यटक
दरवर्षी लाखो पर्यटक कोकण किनारपट्टीवरील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर येत असतात.
3/9
मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी
या पर्यटकांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतात. मात्र अनेकवेळा उत्साहात पर्यटकांकडून स्थानिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते.
4/9
पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत
वारंवार होणाऱ्या पर्यटक बुडण्याच्या घटनांमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.
5/9
प्रवाहाचा पर्यटकांना अंदाज नसतो
समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा पर्यटकांना अंदाज नसतो. त्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येतो आणि दुर्घटना घडतात. दिवेआगर येथे नुकताच आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
6/9
आकडेवारी समोर आली
असं असतानाच रायगड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात समुद्र किनाऱ्यांवर बडून किती जणांचा मृत्यू झालाय याची आकडेवारी समोर आली आहे.
7/9
कोणत्या साली किती पर्यटक बुडाले?
रायगड जिल्ह्यामध्ये 2022 साली पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर 2023 मध्ये सात, 2024 मध्ये पाच, 2025 मधील 11 तर 2026 मधील 10 जणांचा बुडून मृत्यू झाला. (सर्व फोटो प्रातिनिधिक; सौजन्य - रॉयटर्स, सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
8/9
रायगड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात...
रायगड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल 28 पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय ठरतोय.
9/9
उपाययोजना करण्याची मागणी
रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या पर्यटक बुडण्याच्या दुर्घटना लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक; सौजन्य - रॉयटर्स, सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)