• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /घरांना दरवाजे नसलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव! बँकेलाही दरवाजा नाही, लॉकरही उघडे, कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर...

घरांना दरवाजे नसलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव! बँकेलाही दरवाजा नाही, लॉकरही उघडे, कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर...

Reported ByVanita Kamble
Published: Oct 15, 2026, 09:45 PM IST|Updated: Oct 15, 2026, 09:56 PM IST
joinshare
घरांना दरवाजे नसलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव. या गावात बँकानाही दरवाजे नाहीत.

Shani Shingnapur Village: महाराष्ट्रात एक अनोखे गाव आहे. या गावात एकाही घराला दरवाजा नाही. अगदी श्रीमंताच्या बंगल्यात देखील एकाही खोलीला दरवाजा पहायला मिळणार नाही. या गावात फक्त घरानांचा नाही तर, शाळा,  दुकाने, हॉटेल इतकंच नाही तर बँकाना देखील दरवाजा नाही. बँकेच्या लॉकरला देखील कुलूप नाही. हे अनोखो गाव फक्त देशभरातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. दरवाजे नसूनही या गावात कधीच चोरी होत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असले या गावची सुरक्षा कोण करतं. या गावची सुरक्षा ही गावाच्या एका जुन्या परंपरेसह आणि धार्मिकतेसह जोडलेली आहे. या गावची कहाणी जाणून तुम्ही थक्क व्हाल.  

Shani Shingnapur Village1/8

बँकेलाही दरवाजा नाही

सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक घराला दरवाजा हा असतोच. कार्यलये बँका येथे तर सुरक्षारक्षक देखील तैनात असतात. पण, महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं घरांना दरवाजे नाहीत. फक्त घरांनाच नाही तर इथं बँकेला देखील दरवाजा नाही. या गावात कधीच चोरी होत नाही. कुणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या सोबत काय होते जाणून थक्क व्हाल.
Shani Shingnapur Village2/8

शनिदेवाचे जागृत स्थान

घरांना दरवाजे नसलेल्या महाराष्ट्रातील या सर्वात सुरक्षित गावाचे नाव आहे श्री क्षेत्र शनि शिंगणापूर. शनिदेवाचे जागृत स्थान म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
Shani Shingnapur Village3/8

कोणीही घराला दरवाजा बसवत ना

शनि शिंगणापूर गावातील लोकांची शनि देवावर प्रचंड श्रद्धा आहे. या गावाची सुरक्षा व्यवस्था शनि देवाच्या श्रद्धेवरच अवलंबून आहे. यामुळेच येथे कोणीही घराला दरवाजा बसवत नाही.
Shani Shingnapur Village4/8

शनिची साडेसाती मागे लागते

या गावात कधीच चोरी होत नाही. कारण कुणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामागे शनिची साडेसाती लागते. यामुळे कुणीच येथे चोरी करण्याचा प्रयत्न करत नाही असं ग्रामस्थ सांगतात.
Shani Shingnapur Village5/8

शनिदेव प्रत्येक संकटातून वाचवतो

शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून वाचवतो असा शनि शिंगणापूर गावातील स्थानिकां विश्वास आहे.
Shani Shingnapur Village6/8

काळ्या दगडाची शीळा

येथे शनिदेव मूर्तीच्या स्वरूपात नाहीत. येथे एका लांब काळ्या दगडाची शीळा आहे. याबाबद्दल अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.
shani shinganapur 7/8

शनिदेव मंदिराला शिखर, छप्पर किंवा भिंती नाहीत

या शनिदेव मंदिराला कोणतेही शिखर, छप्पर किंवा भिंती नाहीत. शनिदेवाची शिळा उघड्यावर एका चौथऱ्यावर विराजमान आहे. येथे दर शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा आणि तेलाचा अभिषेक केला जातो.
shani shingapur8/8

शनि शिंगणापूरला जायचं कसं?

नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. गाव शिर्डीपासून साधारण 70 किमी आणि अहिल्यानगरपासून 35 किमी अंतरावर आहे. नगर- औरंगाबाद राज्यमार्गावरील घोडेगावपासून पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर, तर नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरीपासून पश्चिमेस वीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
TAGS:
Maharashtra Tourism
Nashik
Maharashtra News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.