• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /ST बस Drivers संदर्भात धक्कादायक बातमी! 400 ते 500 ड्रायव्हर मागील 5 वर्षांपासून...; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

ST बस Drivers संदर्भात धक्कादायक बातमी! 400 ते 500 ड्रायव्हर मागील 5 वर्षांपासून...; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 22, 2026, 02:04 PM IST|Updated: Oct 22, 2026, 02:26 PM IST
joinshare
राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराबद्दल शंका उपस्थित करणारा एक प्रकार समोर आला आहे. नेमका हा प्रकार काय आणि यामुळे प्रवाशांची सुरक्षा कधी धोक्यात आली आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...

महाराष्ट्राची लाईफ लाइन असलेल्या एसटीसंदर्भातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नेमकं झालंय काय जाणून घ्या...

msrtcnews1/8

एसटीला वेतनासाठी निधी कमी पडल्यास

एसटीला वेतनासाठी निधी कमी पडल्यास तो देण्याची हमी राज्य सरकारने कामगार संघटनांच्या संपाच्या वेळी दिली होती. त्यामुळे आता आणखी आर्थिक बोजा पडायला नको, यासाठी सरकार नवीन ड्रायव्हरच्या पगाराचा आर्थिक बोजा घेण्यास तयार नाही. त्यावर मार्ग काढण्यासाठी एसटीकडून कंत्राटी ड्रायव्हर टप्प्याटप्प्याने नियुक्त करण्यात येणार आहेत.
msrtcnews2/8

आणखी ड्रायव्हर लागतील

नवीन बसगाड्यांची खरेदी केल्यावर आणखी ड्रायव्हर लागतील, हे गृहीत धरून एसटीने राज्य सरकारकडे भरतीसाठी परवानगी मागितली होती. मात्र एसटीच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकारने ती नाकारली.
msrtcnews3/8

10 हजारांहून अधिक बसगाड्या खरेदी करण्यात येणार असून...

एसटीकडून पुढील 2 ते 3 वर्षात 10 हजारांहून अधिक बसगाड्या खरेदी करण्यात येणार असून त्या टप्प्याटप्याने सेवेत दाखल होतील. एसटीकडे सध्या 16 हजारांहून अधिक बसगाड्या असून ड्रायव्हरचा तुटवडा आहे.
msrtcnews4/8

का देण्यात आलेत हे ड्रायव्हर?

आरटीओ अधिकारी, भरारी पथके व इतरांसाठी त्या विभागाकडून नवीन भरती होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. पण आरटीओ विभागाने गरजेनुसार भरतीच न केल्याने अजूनही हे ड्रायव्हर त्यांच्या सेवेत आहेत.
msrtcnews5/8

प्रवाशांच्या सुरक्षेला धाब्यावर बसवून हा निर्णय

कंत्राटी ड्रायव्हरचे अनुभव चांगले नसताना त्यांच्याकडून अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या असताना प्रवाशांच्या सुरक्षेला धाब्यावर बसवून हा निर्णय घेतला जात आहे. एसटीने पाच वर्षांहूनही अधिक काळ परिवहन खात्याच्या दिमतीला आपले 500 हून अधिक ड्रायव्हर प्रतिनियुक्तीवर दिले आहेत.
msrtcnews6/8

स्वतःचे 400 ते 500 ड्रायव्हर गेली पाच वर्षे कोणाला दिलेत?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एसटीकडे ड्रायव्हरची कमतरता असताना त्यांचे स्वतःचे 400 ते 500 ड्रायव्हर गेली पाच वर्षे आरटीओ विभागाच्या दिमतीला दिलेले आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला सोसावा लागत आहे.
msrtcnews7/8

ड्रायव्हरचा तुटवडा

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीकडे ड्रायव्हरचा तुटवडा आहे. त्यातच राज्य सरकारने कायमस्वरूपी सेवेत ड्रायव्हर घेण्याची परवानगी न दिल्याने एसटी प्रशासनाने 12 ते 13 हजार ड्रायव्हर कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
st bus news driver8/8

एसटीसंदर्भातील आकडेवारी चर्चेत

लालपरीसंदर्भातील थक्क करणारी माहिती समोर आली आहे. नेमका हा प्रकार आहे काय, जाणून घेऊयात...
TAGS:
Maharashtra News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.