मुंबईकरांवर सध्या दुहेरी संकट घोंगावतंय. वाढत्या हवा प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरत आहे..
2/7
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर
मुंबई शहरातील प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलंय. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरात मुंबईत जगात थेट तिस-या क्रमांकावर आहे. त्यातच आता पाणीसंकटही गहिरे होत चाललंय
3/7
पाणीसाठा 8 टक्क्यांनी घटला
बाष्पीभवनामुळे 22 दिवसांत धरणांमधील पाणीसाठा 8 टक्क्यांनी घटला आहे. 1 ऑक्टोबरला 96 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आता 88 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
4/7
पाणी कसे पुरणार
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्यामुळे पुढील वर्षापर्यंत पाणी कसे पुरणार याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
5/7
पाण्याची वाफ
बाष्पीभवनामुळे दररोज 250 दशलक्ष लिटरचे पाण्याची वाफ होत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
6/7
बाष्पीभवन वेगाने
एल निनोमुळे तापमानवाढीमुळे यंदा बाष्पीभवन वेगाने होत असल्यामुळे पाणीसाठा खालावत असल्याचेही बोलले जात आहे.
7/7
वायुप्रदूषणात वाढ
मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. शहरभर धूर आणि धुरक्याचे साम्राज्य पसरले असून दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे.