शायना एनसी यांचे नाव गिनिज बुकातही नोंद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडल्याने शायना एनसी सध्या चर्चेत आहेत.
Shaina Nc : शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी वादात सापडल्या आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्याच्या नादात शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सर्व वादामुळे शायना एनसी चर्चेत आल्या आहेत. अशातच त्यांची आणखी माहिती सर्च केली जात आहे. शायना एनसी यांच्या नावावर आहे Guinness World Record आहे. तर, त्यांच्याकडे 146 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
1/8
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शायना एनसी यांनी भाजपची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शायना एनसी शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत.
2/8
शायना एनसी भाजपच्या नेत्या आहेत आणि राजकारणात दीर्घकाळापासून सक्रीय आहेत. शायना एनसी यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे शेरीफ होते
3/8
शायना नाना चुडासामा असे त्यांचे नाव आहे. राजकारणी आणि समाजसेवक आहेत. शायना एनसी व्यवसायाने फॅशन डिझाईनर आहेत.
4/8
शायना एनसी भारतीय फॅशन इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहेत. एकच साडी तब्बल 54 वेगवेगळ्या पद्धतीत कशा नेसायचा यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.
5/8
शायना एनसी क्वीन ऑफ ड्रेप्स' म्हणूनही ओळखल्या जातात. सर्वात वेगवान साडी नेसण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. यासाठी त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
6/8
शायना एनसी यांनी 2004 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्या भाजपच्या प्रवक्त्या होत्या.
7/8
मुंबईतील क्वीन मेरी स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी घेतली. न्यूयॉर्क फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
8/8
2024 विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. शायना एनसी यांच्याकडे 146.89 कोटींची संपत्ती आहे. शायना एनसी यांच्यानावावर एक रुपयांचेही कर्ज नाही.